सातपूर | Satpur

एचपीसीएल नाशिक रिजनल ऑफीस द्वारे आपल्या नाशिक शहरामध्ये के.आर. बुब पेट्रोल पम्पावरून अंबड येथून नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच डिझेलची होम डिलेव्हरी सेवा मिळ्णार आहे.

या सेवेचा उदघाटन समारंभ सोमवारी के.आर.बुब पेट्रोल पम्प येथे एचपीसीएलचे नाशिक रिजनल ऑफीस चे मुख्य अधिकारी प्रलय जांभुळकर यांच्या ह्स्ते पार पडला,

याप्रसंगी आयामाचे अध्यक्ष वरून तलवार, सीनियर सेल्स ऑफीसर नवलकिशोर, रिटेल इंजिनियरिंग मॅनेजर पराग दाणी, उन्मेष कुलकर्णी, राजेंद्र पानसरे, गोविन्द झा, अमोल जाधव होते.

यावेळी एचपीसीएलचे नाशिक रिजनल ऑफीस चे मुख्य अधिकारी प्रलय जांभुळकर म्हणाले की यामुळे उद्योजकांची वेळ व पैसे, वाहतूक नियंत्रण, ट्रान्सपोर्टेशन याची मोठ्या प्रमाणात बचत हॊणार आहे. नाशिक जिल्ह्यात अशी सेवा देणारा के.आर.बुब पेट्रोल पम्प पहिला पम्प ठरला असल्याने अंबड व सातपूर औद्योगिक परिसरातील उद्योजक, व्यावसाईकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

प्रदीप बुब यांनी उद्योजक, कामगार, नागरिक यांच्याकरिता पेट्रो कार्ड, पीयूसी, सारख्या योजना राबविल्या आहेत, त्यांच्या या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून निश्चितच उद्योजक, व्यावसायिकांचा फायदा होणार असल्याचे सांगेतले.

यावेळी मनपाचे माजी सभापती अमोल जाधव यांनीही या संकल्पनेचे कौतुक केले व आपले मत मांडले. संचालक ललित बुब यांनी या संकल्पने विषयी माहिती दिली.

ज्याप्रमाणे सर्व दूर देशात एप वरून टॅक्सी सेवा, खाण्याच्या वस्तूंची सेवा व इतर सेवा फॊनद्वारे बुक करून मागवता येतात त्याचप्रमाणे आता उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी एचपीसीएल कम्पनीद्वारा नाशिकमध्ये के.आर. बुब पेट्रोल पम्पवरून अंबड येथून डिझेलची होम डिलेव्हरी सेवा मिळ्णार आहे.

पम्पावर आर्डर बुक केल्यानंतर ही डिझेलची सेवा मिळणार असल्याचे के.आर.बुब पेट्रोल पम्पचे संचालक श्री ललित बुब व प्रदीप बुब यांनी सांगितले.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लीमीटेड (एचपीसीएल) पेट्रोल पम्प ऑन व्हील सेवा सुरु करन्यात येत आहे.

या वाहनांमध्ये डिस्पेन्स मशीन व नोझल पेट्रोल पम्प सारखेच कार्यरत राहणार असून १० किलोमीटरच्या परिसरातील येणाऱ्या सर्व ऑर्डर करीता फ्री डिझेलची डिलेव्हरी सेवा मिळणार आहे.

यापुढे लांबवरच्या सेवेच्या अंतरासाठी शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. यावेळी शोभना बुब, साक्षी बुब, उद्योजक उपस्थित होते.