महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात नाशिकची दिया पठाण

महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात नाशिकची दिया पठाण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वरोरा Varora येथे ज्युनियर गटाच्या मुलांच्या आणि मुलींच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणी स्पर्धेत कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांची निवड करण्यात आली. हे निवड झालेले संघ दि. 25 ते 30 डिसेबर दरम्यान बर्धमान,पश्चिम बंगाल West Bengal येथे आयोजित ज्युनियर गटाच्या 47 व्या राष्ट्रीय र्व्हॉलीबॉल स्पर्धेत 47th National Volleyball Championship महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील.हा संघ रवाना झाला आहे.

वरोरा येथे पार पडलेल्या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे मुलांमध्ये लातूरच्या तीन, कोल्हापूरच्या तीन, नागपूरच्या दोन तर अमरावती आणि पुणे या जिल्ह्यांच्या प्रत्येकी एक खेळाडूचा समावेश आहे. तर मुलींमध्ये पुणे विभागाच्या तीन, कोल्हापूर विभागाच्या तीन, औरंगाबाद विभागाच्या दोन, तर नाशिक विभागाच्या दिया पठाण Diya Pathan, Nashik या एक खेळाडूचा समावेश झाला आहे. या निवड झालेल्या संघांचे सराव शिबिर विवेकानंद स्पोर्ट्स क्लब, भद्रावती, चंद्रपूर येथे पार पडले.

महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोज म्हस्के (नाशिक), सहाय्यक मार्गदर्शक म्हणून रवी बनसोड (चंद्रपूर) तर व्यवस्थापक म्हणून चंद्रपूरचे जय मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुलींच्या संघाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी जाधव (पुणे), सहाय्यक मार्गदर्शक म्हणून पापा शेख (पुणे) तर व्यवस्थापक म्हणून मुंबईच्या सौ. दिव्या सोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र संघातील खेळाडू

मुले :- कृपेश पाटील - कर्णधार (कोल्हापूर), कमलेश महादकर ( लातूर) सईद अर्शद अली ( लातूर), अनिकेत श्रीसागर ( नागपूर), रोहित साळुंके ( कोल्हापूर), सुरज राठोड ( लातूर), रीकीन टोंगे ( नागपूर), ओम भोसले( अमरावती), चेतन बालबुडे ( नागपूर), शिराज बांदल (पुणे) रोहित सूर्यवंशी ( कोल्हापूर ) मुख्य प्रशिक्षक - मनोज म्हस्के ( नाशिक) सहाय्यक प्रशिक्षक - रवी बनसोड ( चंद्रपूर) व्यवस्थापक - जय मानकर ( चंद्रपूर )

मुली :- प्रांजली उदेकर - कर्णधार (पुणे ), सिद्धी जानकर ( औरंगाबाद), ऋतुजा कुंभार ( औरंगाबाद ),दिया पठाण (नाशिक), वेदिका शिंदे (पुणे ),तन्वी देशपांडे (पुणे ),तन्मई देशमुख ( पुणे), प्रिया डोंगे ( नागपूर ), अक्षदा वावरे (कोल्हापूर),आरती कांबळे (कोल्हापूर) स्वाती पाटील ( कोल्हापूर) मुख्य प्रशिक्षक - शिवाजी जाधव ( पुणे) सहाय्यक प्रशिक्षक - पापा शेख (पुणे) व्यवस्थापक - सौ. दिव्या वर्मा-सोनी (मुंबई)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com