धुमाळ पॉईंट - पिंपळपार कामास प्रारंभ
नाशिक

धुमाळ पॉईंट - पिंपळपार कामास प्रारंभ

स्मार्ट सिटीच्या कामांना वेग

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीकडुन शहरात सुरू झालेल्या विकास कामांपैकी गावठाण भाग विकास कामांतर्गत असलेल्या धुमाळ पाईंट ते पिंपळपार चौक गाडगे महाराज पुल रस्त्याचे रखडलेल्या कामात काल (दि.१३)पासुन प्रारंभ करण्यात आला. या रस्ता विकास कामांमुळे याभागात पुराच्या पाण्यामुळे व्यापार्‍याचे नुकसान टळणार असुन अतिक्रमण आपोआप हटले जाणार असुन हे काम वेळेत पुर्ण करण्याची मागणी व्यावसांयिकांनी केली आहे.

करोना लॉकडाऊनमुळे रखडलेले स्मार्ट सिटी कंपनीच्या नाशिक शहर गावंठाणातील रस्ते विकास कामातील धुमाळ पाईंट ते पिंपळपार चौक गाडगे महाराज पुल या रस्त्यांच्या कामा प्रारंभ करण्यासाठी ठेकेदार कंपनीकडुन जेसीबीसह आणलेल्या मशिनरी काही दिवसापुर्वी आणण्यात आल्या आहे. मात्र स्मार्ट सिटीच्या त्र्यंबक सिग्नल ते अशोक स्तंभ या पायलट रस्त्याच्या कामांचा मोठा वाईट अनुभव नाशिककरांना आला होता.

अनेक महिने रखडलेले कामातील घारापुरे घाटातील काम अद्यापही सुरू आहे. या कामाप्रमाणेच धुमाळ पाईंट ते पिंपळपार चौक रस्त्याच्या कामाचे होईल अशा शक्यतेने काही स्थानिक नागरिकांनी या कामास विरोध दर्शवित ठेकेदारास काम न करण्यास सांगितले होते. यामुळे याठिकाणी मशिनरी आणुन पडल्यानंतर काम थांबले होते.

तसेच दुसरीकडे याभागातील व्यापार्‍यांनी हे काम तातडीने सुरु करुन वेळेत पुर्ण करण्यासाठी कामाच्या समर्थनार्थ आंदोलन पुकारले होते. या एकुणच वादाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी अधिकारी व महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या मध्यस्तीने वाद मिटविण्यात आला. यानंतर आजपासुन या महत्वांच्या रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने नािाक गावठाण भाग (एबीडी एरिया) या अंतर्गत रस्ते विकासाची २०० कोटींची लहान मोठ्या रस्त्यांची काम धरण्यात आली आहे. या कामांची निवीदा प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर लॉकडाऊनमुळे रखडलेले या कामातील पहिले असलेले धुमाळ पाईंट ते पिंपळपार चौक रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. हे काम दिलेल्या मुदतीत पुर्ण करण्यात यावेत, अशी मागणी करतांनाच हा रस्ता अरुंद व वाहतुकीचा असल्याने हे काम मुदत न झाल्यास मोठा मोठा असंतोष उमटण्याची शक्यता या व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने शहरातील गावठाण रस्ता विकास कामांतर्गत धुमाळ पाईंट ते पिंपळपार चौक रस्त्याच्या कामास स्थानिक काही नागरिकांनी विरोध केला होता. मात्र संबंधीतांशी चर्चा झाली आहे. यामुळे आता या कामास कोणाचा विरोध नसुन या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी नाशिक

Deshdoot
www.deshdoot.com