थकित करवसुलीसाठी महापालिकेकडून ढोल बजाओ

थकित करवसुलीसाठी महापालिकेकडून ढोल बजाओ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेने (NMC )मागील वर्षाच्या पाणीपट्टी ( Water Bills )व घरपट्टी ( House Tax )वसुलीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली केली. मात्र असे असले तरी घरपट्टीची तब्बल पाचशे कोटींची थकबाकी आहे. थकबाकीचा डोंगर पाहता पालिका प्रशासनदेखील ती वसूल करण्यास हतबल ठरत आहे, असे चित्र आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनातर्फे बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवण्यात येणार आहे. ढोल वाजवून त्यांना पाणीपट्टी आणि घरपट्टीचा कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.

उत्पन्नाचे मुख्य साधन घरपट्टी व पाणीपट्टी असते, मात्र अनेक जण ती भरत नाही. करवसुली न झाल्याने उत्पन्नात घट होते. त्यामुळे महसुलाला मोठा फटका बसतो. आता नाशिक महापालिकेने अशा थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. जे बडे थकबाकीदार आहेत त्यांच्या घरापुढे जाऊन ढोल वाजवण्यात येणार आहे. घरासमोर ढोल वाजवल्याने तरी ते घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरतील, अशी अपेक्षा महापालिकेला आहे.

शहरात अनेकांनी घरपट्टी तसेच पाणीपट्टीचा कर थकवला आहे. थकबाकी वसूल होत नसल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. अखेर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. हा थकबाकीचा आकडा तब्बल पाचशे कोटींवर पोहोचला आहे. ही थकबाकी वसूल कशी करायची, असा मोठा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला होता.

मात्र आता यासाठी महापालिका प्रशासनाने जे बडे थकबाकीदार आहेत त्यांच्या घरासमोर ढोल वाजवला जाणार आहे. नाशिकमध्ये अनेकांनी पाणीपट्टी आणि घरपट्टी थकवली आहे. थकित पाणी आणि घरपट्टीचा आकडा हा तब्बल पाचशे कोटींवर पोहोचला आहे. ही थकित रक्कम वसूल करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com