
ओझे l वार्ताहर | Oze
दिंडोरी तालुका (dindori taluka) ग्रामसेवक (gram sevak) संघटनेची निवडणुक (election) आज दिंडोरी प. समिती येथे निवडणुक निर्णय अधिकारी बी.वाय.पाटील तसेच डि.के.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शांतेत पार पडली.
सदर निवडणुक बिनविरोध (Election unopposed) न झाल्यामुळे मतदान (voting) पध्दतीने घेण्यात आली पडली. या निवडणुकीत तालुका अध्यक्षपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आले तर सचिव पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आले. मागील तालुका अध्यक्ष सोमनाथ ढोकरे (Taluka President Somnath Dhokere) पुन्हा अध्यक्षपदाची निवडणुक जिंकून त्यांची दिंडोरी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
तर सचिवपदी रविंद्र चौधरी (Ravindra Chaudhary as Secretary) यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर जाधव, महिला उपाध्यक्षपदी श्रीमती यमुना काळू थविल, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर पाटील, सहसचिव पुरुष पदासाठी समाधान शेवाळे, सहसचिव स्त्री पदासाठी श्रीमती कविता बेडसे , संघटक पुरुष पदासाठी रामदास गायखे तर महिला संघटक म्हणून शीमती निर्मला खांडवी यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामसेवकांनी अभिनंदन केले