ढोबळी-हिरवी मिरचीला सर्वाधिक भाव

नाशिक मार्केटमध्ये पालेभाज्यांचा भाव घसरला
ढोबळी-हिरवी मिरचीला सर्वाधिक भाव

नाशिक | Nashik

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासुन ढगाळ वातावरणात रिमझिम पाऊस पडत असुन याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

असे असले तरी या बदलेल्या हवामानाचा फायदा भाजीपाल्यांना होत आहे. या पालेभाज्यास पोषक वातावरणातही ठराविक भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.

यात ढोबळी मिरची, हिरवी मिरची दोडके, गवार व दोडके यांना नाशिक मार्केेट कमेटीत चांगला भाव मिळत आहे. शनिवारी (दि.12) नाशिक मार्केट कमेटीत 11 हजाराच्यावर क्विंटल भाजीपाला - फळांची आवक झाली असुन 118 भाजीपाला, फळे व कांदा -बटाटा वाहने मुंबईसह शेजारील राज्यात रवाना झाली.

नाशिक जिल्ह्यात नोव्ंहेंबर महिन्यानंतर कोरडे वातावरण असुन थंडीच्या वातावरणानंतर गेल्या तीन चार दिवसापासुन हवामानात अचानक बदल झाला आहे.

यात अचानक किमान तापमान वाढल्यानंतर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणात जिल्ह्यातील काही भागात रिमझीम असा अवकाळी पाऊस पडत आहे. याचा फटका द्राक्ष व फळबांगाना होत असला तरी हे वातावरण भाजीपाल्यास पोषक आहे.

या वातावरणात पालेभाज्यासह भाजीपाला आवक स्थीत आहे. यात दि. 12 डिसेंबर रोजी मार्केट कमेटीत 11 हजार 510 क्विंटल इतकी शेतीमालाची आवक झाली. परिणामी मागील आठवड्याच्या तुलनेत भावात अल्प घसरण झाली.

शनिवारी (दि.12) रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत वांगी प्रति क्विंटल 1300 रु.(आवक 198 क्विंटल), ढोबळी मिरची (आवक 92 क्विंटल) सर्वाधिक असा 3 हजार 500 रुपये, गवारला 2 हजार रु.(आवक 11 क्विंटल), दोडका3125 रु(एकुण आवक 92 क्विंटल), गिलके 2080 रु.(एकुण आवक 62 क्विंटल), भोपळा 600 रु.(एकुण आवक 734 क्विंटल), टमाटा 2250 रु.(एकुण आवक 730 क्विंटल), फ्लॉवर 600 रु.(एकुण आवक 1210 क्विंटल), कोबी 700 रु.(एकुण आवक 1127 क्विंटल), काकडी 900 रु.(एकुण आवक 827 क्विंटल), भेंडी 1920 रु. (आवक 45 क्विंंटल) असा भाव मिळाला.

तसेच समितीत 12 डिसेंबर रोजी कांद्याला प्रति क्विंंटल 2450 रु.(आवक 2340 क्विंटल), बटाटा 2600 रु.(आवक 852 क्विंटल) आणि लसुन 8150 रु. (आवक 17 क्विंटल) असा भाव मिळाला.

नाशिक मार्केट कमेटीतून मंगळवारी मुंबई उपनगरे करिता 79, गुजरात 26, जळगांव 4, औरंगाबाद 2, पुणे 2, दिल्ली 2 व मध्य प्रदेश 3 अशी 118 भाजीपाल्याची वाहने रवाना झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com