जिल्हा परिषदेत मद्यपीचा धिंगाणा

जिल्हा परिषदेत मद्यपीचा धिंगाणा
जिल्हा परिषद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) दि. २५ ते २८ ऑगस्ट अशा चार दिवसांच्या दौऱ्यावर राज्याची पंचायतराज समिती येणार आहे. सन २०१६-१७ आणि सन २०१७-१८ मधील प्रशासकीय तपास समितीच्यावतीने होणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी सुटीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहून काम करत असल्याचे चित्र आहे...

सोमवारी (दि.16) पारशी नववर्षाची शासकीय सुटी असताना जिल्हा परिषदेत हजर राहिलेल्या अधिकार्‍यांना एका मद्यपीने संघटनेच्या नावाखाली दमबाजी करत धिंगाणा घातल्याची घटना घडली. अशा व्यक्तींवर तातडीने कारवाई करुन त्यांना पायबंद घालण्याची मागणी अधिकार्‍यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर-झनकर (Vaishali Zankar) यांच्या लाच प्रकरणात प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते (Pankaj Dashpute) निलंबित आहे. ही घटना घडते न घडते तोच फाईल ठेकेदार स्वतः घेउन गेल्याप्रकरणी लघु पाटबंधारे विभागातील लिपिक रवी ठाकरे (Ravi Thackeray) यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

तर कार्यालयीन प्रमुखास प्रशासनाने नोटीस बजावण्याची तत्परता दाखवली. अशा घटना एकीकडे घडत असताना सुटीच्या दिवशी कामावर हजर असताना अधिकार्‍यांना एका मद्यपीने त्यांच्या कार्यालयात येत दमबाजी केल्याचा प्रकार सोमवारी (दि.१६) घडला.

मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांच्या कार्यालयात प्रवेश करत या मद्यपीने थेट पैशांची मागणी केली. त्याच्या मागणीनंतर तुमचे काही काम असेल तर सांगा नाहीतर येथून निघा, अशा शब्दात त्याला कार्यालयातून बाहेर काढण्यात आले.

प्रशासन तत्परता दाखवणार का ?

अधिकार्‍यांना अशाघ्य भाषेत शिवीगाळ करत हा मद्यपी प्रवेशद्वाराजवळ आला. येथील सुरक्षारक्षकाशीही त्याने हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला येथील दोन-तीन सेवकांनी हुसकावून लावले.

ठेकेदार फाईल घेऊन गेला म्हणून सेवकांवर तातडीने कारवाई केली जाते.मग अशा मद्यपींवर कारवाई करण्याची प्रशासन तत्परता दाखविणार का? असा प्रश्न सेवक वर्गातून उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com