जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाला सात महिने पूर्ण
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नाशिक | Nashik

शेती वाचवा, लोकशाही वाचवा-शेतकरी विरोधी कायदे रद्द करा आणि एम.एस.पी ची कायदेशिर हमी द्या, या मागण्यासाठी आज शेतकरी संघ समितीतर्फे (Farmers Sangh Commiittee) जिल्हाधिकारी कार्यालया (Nashik Collector Office) समोर धरणे आंदोलन (Dharne Agitation) करण्यात आले.

शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्या या मागणीसाठी सर्व ठिकाणाहून शेतकरी दिल्लीच्या (Delhi) सीमेवर गेल्या ७ सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या गोष्टीतला आज सात महिने पूर्ण झाल्याने हे धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसतांना नवे कृषी कायदे (Agriculture Acts) केले आहेत. ते काळे कायदे मागे घेण्याबाबत सरकारने त्वरीत निर्णय घेणे आवश्यक आहे. सदर कायदे लागू करतांना संसदीय समित्यांना पाठवून त्यावर आवश्यक चर्चा झाली नाही, त्याच बरोबर कायदे पारित करतांना राज्य सभेत (Rajyasabha) मतदानही झाले नव्हते किंवा विरोधकांचा विरोध असतांना देखिल आपल्या ताकदीच्या जोरावर हे कायदे पारित करण्यात आले आहेत. शेतकरी कर्जात बुडाले आहेत आणि गेल्या ३० वर्षात ४ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना आत्महत्या (Farmers Suicide) झाल्या आहेत. म्हणूनच ते कायदे रद्द करा.

स्वामीनाथन आयोगाच्या सुत्राप्रमाणे (सी २ + ५० टक्के) शेतकऱ्याला त्यांच्या संपुर्ण पिकाची खरेदी आधारभूत किमतीवर मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात सिताराम ठोंबर, सुनिल मालुसरे, राजू देसले, तानाजी जायभावे, किसन गुजर, शर्शी उनवणे, महादेव खुडे, प्रभाकर वायचळे, रमेश आवट, गोरखनाथ बलकवडे, विठ्ठल घुले, अशोक खालकर, पद्माकर इंगळे, देविदास हजारे, शुभम ढेरे, रोहन पगारे, स्वाती त्रिभुवन, दिनेश सातभाई, संतोष काकडे, मुकुंद रानडे, तुकाराम सोनजे आदींंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com