सुरगाणा
सुरगाणा
नाशिक

सुरगाणा : श्रमजीवी संघटनेचे रेशनकार्ड साठी धरणे आंदोलन

Gokul Pawar

Gokul Pawar

सुरगाणा | Surgana

वेळोवेळी मागणी करूनही रेशनकार्ड मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने सुरगाणा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील जवळपास असंख्य कुटुंबांना रेशनकार्डची मागणी करुनही मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याआधी ४७८ कुटुंबाना रेशनकार्ड देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही. म्हणून मे महिन्यात भर उन्हात तीन चार दिवस श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

त्यानंतर या ऑगस्ट महिन्यात ५९२ कुटुंबांचे अर्ज देण्यात आले. यावेळी देखील केवळ आश्र्वासन देण्यात आले. रेशनकार्ड मिळण्याची मुदत १८ आॅगष्ट पर्यंत संघटनेच्या वतीने देण्यात येऊन न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

स्थानिक प्रशासनाकडून आश्वासनाची पुर्तता न झाल्याने तालुका श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, तालुका अध्यक्ष राजू राऊत यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

न्यायालयाचा निर्णय असूनही रेशनकार्ड दिले जात नाही. करोना संकट सुरू आहे. अशा वेळी जवळपास पाचशे अर्जधारक रेशनकार्ड पासून वंचित आहेत. रेशनकार्ड व धान्य देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

-भगवान मधे, जिल्हा सरचिटणीस - श्रमजीवी संघटना

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com