जिल्हा केमिस्ट असोसिएशनवर धनसिध्दीविनायक पॅनलचे वर्चस्व

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनची (Nashik District Chemists Association) दर तीन वर्षांनंतर होणारी निवडणूक (Election) पहिल्यांदा सुमारे आठ वर्षांनंतर झाली. या निवडणूक निकालात धनसिध्दीविनायक पॅनलने जिल्हा स्थराच्या 4 जागांपैकी तीन जागा तर शहर गटातील 21 जागांपैकी 20 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. समर्थ पॅनलला जिल्हास्तराची एक तर शहर गटातील एक अश्या केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले...

या निवडणूकीसाठी गंगापूर रोडवरील धनदाई लॉन्स येथे रविवारी (दि. 16) सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. यात 2384 मतदारांंपैकी 66 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री लगेचच मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. पहाटे 6 वाजता मोजणी प्रक्रिया समाप्त झाली.

जिल्हा गटाच्या 4 जागांच्या लढतीत दोनही गटाकडून 4-4 उमेदवार रिंगणात होते. त्यात धनसिध्दीविनायक पॅनलचे अतुल अहिरे, योगेश बागरेचा, रत्नाकर वाणी हे विजयी झाले. तर संघटनेचे माजी अध्यक्ष व समर्थ पॅनलचे प्रणेते गोरख चौधरीयांनी निसटा विजय मिळवला.

शहर प्रतिनिधी साठीच्या 13 जागापैकी 12 जागा धनसिध्दीविनायक पॅनलने निर्विवाद विजय पटकावला असून,एकमेव जागेवर समर्थ पॅनलचा उमेदवार विजय मिळवता आला.या गटात धनसिध्दीविनायक पॅनलचे प्रफुल्ल पारख, अतुल नागरे, मयुर मणिआर, दीपक जाधव, निलेश शिरुडे, योगेश कदम, मिनल गिडीया, शरद धनवटे, यादव जाधव, राहुल ब्राम्हणकर, सुनिल पवार, उमेश वरखेडे हे विजयी झाले.तर समर्थ पॅनलचे शशांक बागड हे आपल जागा राखण्यात यशस्वी ठरले.

शहर परिसरातील सर्वच्या सर्व जागा धनसिध्दीविनायक पॅनलने पटकावल्या आहेत. त्यात नाशिकरोड विभागाच्या 2 जागावर अमित कवडे, उमेश पवार हे विजयी झाले. नविन नाशिक विभाग (2 जागा) मनोज लोढा, विनोद बाविस्कर, नाशिकरोड विभाग (2 जागा)अमित कवडे, उमेश पवार सातपूर विभाग(1जागा) मंगेश मेतकर, पंचवटी विभाग (1 जागा) प्रशांत पुरकर, द्वारका ते दत्त मंदीर विभाग (1 जागा) योगेश पांडे ,देवळाली कॅम्प-भगुर विभाग (1 जागा) सिमा पवार हे विजयी झाले.

अपेक्षा पूर्ण करणार

या निवडणूकीत क्लिन स्विप देण्याची तयारी होती. या निकालामुळे जबाबदारी वाढली आहे. चांगले काम करावेच लागणार आहे. सभासदाच्या आपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूरेपूर प्रयत्न करणार आहोत.

- अतुल अहिरे, विजयी जिल्हा उमेदवार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com