सप्तशृंगी गडावर बसेस अभावी भाविकांची गैरसोय

सप्तशृंगी गडावर बसेस अभावी भाविकांची गैरसोय

सप्तशृंगी गड | वार्ताहर | Saptashrungi Gad

सप्तशृंगी गडावर बस सेवेचा अभाव असल्यामुळे सप्तशृंगी गडावर दर्शनाला येणाऱ्या भाविकांना बस सेवा मिळवण्यासाठी मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे...

अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई सप्तशृंगी चरणी राज्यातून तसेच परराज्यातून हजारो भाविक हजेरी लावत असतात. मात्र दिवाळीच्या सुट्यांमध्ये बस सेवेअभावी भाविकांना वाट पाहावी लागली. हीच परिस्थिती अद्यापही कायम आहे.

सप्तशृंगी गडावर बसेस अभावी भाविकांची गैरसोय
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

यावेळी भाविकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. बस सेवा मिळाली तरीही बसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने लवकरात लवकर बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी भाविकांकडून व्यक्त होत आहे.

सप्तशृंगी गडावर बसेस अभावी भाविकांची गैरसोय
Video : नाशिक-पुणे महामार्गावर 'द बर्निंग शिवशाही'चा थरार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com