
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
येथे मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असून शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी याठिकाणी भाविकांची (Devotees and Tourists) मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे...
आज रविवार असल्याने त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी (Darshan) मंदिराच्या दोन्ही दरवाजाच्या बाजूने भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तर दुसरीकडे डोक्यावर पावसाच्या सरी कोसळत असताना सुद्धा भाविकांची दर्शनासाठी गर्दी कमी झाली नव्हती.
तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने (Trimbakeshwar Devasthan Trust) भाविकांना बाहेर पडण्यासाठी दक्षिण दरवाजा उघडा ठेवला होता. त्यामुळे मुख्य दरवाजाद्वारे होणारी गर्दी टाळण्यास मदत झाली. तर देवस्थान ट्रस्टकडून देणगी, दर्शन, तिकीट रांग कुठे आहे याबाबत स्पीकरवरून भाविकांना सूचना दिल्या जात होत्या.
दरम्यान,यावेळी दक्षिण दरवाजा नुसता शनिवार-रविवार खुला न ठेवता तो दररोज ठेवावा अशी मागणी भाविकांनी केली. तसेच देणगी दर्शन रांगेची परिस्थिती पाहता कधी तरी धर्मदाय आयुक्तांनी त्र्यंबकेश्वरकडे लक्ष घालावे अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.