सटाणा । प्रतिनिधी

.देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या 134 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त साजरा होणारा यात्रोत्सव करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टतर्फे घेण्यात आला आहे. प्रदीर्घ परंपरा असलेल्या देवमामलेदारांच्या यात्रोत्सवास प्रथमच यावर्षी खंड पडत असल्याने भाविकांसह व्यापारीवर्गात निराशेचे वातावरण आहे.

देवमामलेदार यात्रोत्सव नसल्यामुळे शहरातील अर्थचक्रावर मोठा परिणाम होणार असून येत्या 9 जानेवारी रोजी केवळ महापूजा होऊन सांगता होणार आहे. देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पंरपरेनुसार महापूजेचे मानकरी म्हणून बागलाणचे तहसीलदार, सनपा नगराध्यक्ष व देवस्थानचे अध्यक्ष हे राहणार आहेत. दरवर्षी मार्गशीर्ष वैद्य एकादशीच्या दिवशी पहाटे महापूजा होणार आहे.

यावर्षी शहरात रथ मिरवणूक होणार नसल्याचे देवस्थान समितीने सांगितले. मंदिर सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून भाविकांसाठी खुले राहणार असल्याचे देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.