देवळा : समता परिषदेचे रास्ता रोको आंदोलन

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात मागण्यांचे निवेदन
देवळा : समता परिषदेचे रास्ता रोको आंदोलन

देवळा । प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्यांवर देवळा येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या सूचनेनुसार देवळा येथे पाच कंदिलवर केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात ओबीसी समाजाच्या इतर संघटनासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देवळा पाच कंदिल ह्या ठिकाणी गुरूवारी (दि.१७) रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. सर्वोच्च न्यायालयाने नुकतान एक निर्णंय दिला आहे.

त्यानूसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाच्या सुमारे ५५ हजार जागांवर गंडातर आले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी केंद्र सरकारने ओबीसी समाजाची स्वतंत्र्यपणे जनगणना करावी. यासह विविध मुद्यांवर समता परिषदेच्या मार्गदर्शनाखाली देवळ्यातओबीसी समाज रस्त्यावर ऊतरला.

आंदोलनात समता परिषदेचे तालुका अध्यक्ष दिलीप सोनवणे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर, जि प च्या माजी सभापती उषाताई बच्छाव, आबा खैरणार, संभाजी शेजवळ , हेमलता खैरणार, रमेश आहिरे ,संदीप शेवाळे, साहेबराव शेवाळे, समाधान पवार, संजय बागुल, वसंतराव बागुल आदी सहभागी झाले होते.

आंदोलन स्थळी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी भेट देऊन ओबीसी समाज बांधवाशी चर्चा केली. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com