देवळा : अपघातात नऊ जखमी
नाशिक

देवळा : अपघातात नऊ जखमी

गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ मालेगांव व नाशिकला पाठविले

Abhay Puntambekar

देवळा । प्रतिनिधी Devla

देवळा नाशिक राज्यमार्गावर हॉटेल गोदावरी जवळ काळी-पिवळी जीप आणि छोटा हत्ती यांच्यात भीषण अपघात होऊन ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि , आज शनिवारी दि १८ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास देवळा नाशिक रस्त्यावर हॉटेल गोदावरी नजीक एम एच ४१ इ ५१२४ या क्रमांकाची काळी पिवळी जीप देवळ्याच्या दिशेने येत असताना समोरून येणारा एम एच ४१ ए यु २३९० छोटा हत्ती या दोघात समोरासमोर भीषण अपघात झाला असून, यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत.

यात शामराव बाजीराव आहिरे (५५),केवळबाई मुरलीधर आहिरे ,(६० ), मुरलीधर शँकर आहिरे ,(६५ ), विजय पंडुरंग आहिरे ,(४८) , प्रल्हाद काळू ठोके ,( ४५ ), (सर्व रा .टेभे खालचे ) , अमोल सुखदेव मोरे ,(२९) नगरदेवळाने , दादाजी भरत शिवदे ,(३५) ,निंबोळा , संदीप जीभाऊ देवरे ,(३७) ,लखमापुर, सुशीला शिवाजी सोनवणे ,(६०), सटाणा या जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येऊन , यातील काही गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ मालेगांव व नाशिकला पाठविण्यात आले आहे.

काळी पिवळी वाहनातील लोक दहाव्याच्या कार्यक्रमाला गेले असल्याचे समजते . हा अपघात भीषण असतांना दैव बलवत्तर म्हूणन काळी पिवळी मधील प्रवाशी वाचले आहेत . जीप पलटी होऊन तिचे नुकसान झाले आहे . देवळा पोलिसांत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com