देवळा : फुलेमाळवाडी येथे वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात
नाशिक

देवळा : फुलेमाळवाडी येथे वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात

डॉ.भदाणे फोंडेशन व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने झाली सुरवात

Abhay Puntambekar

वाजगाव । शुभानंद देवरे Vajgaon

फुलेमाळवाडी ता.देवळा येथे वसंतराव नाईक हरित महाराष्‍ट्र अभियान अंतर्गत सन २०२० मधील वृक्ष लागवड मोहिमेला ग्रामपंचायत फुलेमाळवाडी व डॉ.योगेश भदाणे फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीदिनाचे औचित्य साधून सुरुवात करणेत आली.

यावेळी फुलेमाळवाडी अंतर्गत धवळखडी येथील रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करून सुरुवात केली, गांव अंतर्गत शंभर टक्के वृक्ष लागवड करून संगोपन व संवर्धन करण्याचे तेथील युवकांनी निश्चय केला.यावेळी फुलेमाळवाडी सरपंच उषा शेवाळे डॉ .योगेश भदाणे(बोरोटॉन रिसर्च सेंटर प्रा.लि.) ग्रामपंचायत सदस्य सुरेश जगदाळे ,लक्ष्मण बच्छाव, सुरेश शेवाळे ग्रामसेवक अर्चना सोनार, तंटामुक्त समिती अध्यक्ष हिरामण शेवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ.भदाणे यांनी उपस्थित ग्रामस्थ व युकांना मार्गदर्शन करून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचा मोठा वाटा असून पर्यावरण संवर्धन करणे ही फक्त सरकारची , ग्रामपंचायतीची जबादारी नसून सर्वाची ही सामूहिक जबादारी आहे. त्यासाठी युवकांनी झपाटून वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे व पुढील वर्षी आपण लावलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करू असे आव्हान केले. सरपंच उषा शेवाळे, उपरसपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक अर्चना सोनार यांनी वृक्षलागवड व संगोपणासाठी आवश्यक ती मदत करणार असून परिसरात हिरवळ दाटेल चोहीकडे यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करणेसाठी लंकेश बागुल (बागुल टॅक्स कन्सल्टंट), अक्षय बागुल (सचिव डॉ.भदाणे फोंडेशन) हर्षल बच्चव, निलेश बागुल, गौरव शेवाळे, हर्षल बागुल, गौरव मोरे, यादी युवा कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छोटा पर्यावरण दूत मानस सोनारची विशेष उपस्थिती होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com