Video : नाशकात ऑक्सिजन साठा वाढल्यानंतर बेडसंख्याही वाढणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांचा नाशिक दौरा
Video : नाशकात ऑक्सिजन साठा वाढल्यानंतर बेडसंख्याही वाढणार

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (दि.३०) दुपारी ३ वाजता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट दिली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडून देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी रुग्णालयात करोना वॉर्ड आणि ऑक्सिजन बेड्सची माहिती जाणून घेतली.

जिल्हा रुग्णालयातील कुंभमेळा इमारतीत करोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कोरोना वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

वॉर्डमध्ये १५० बेड्स वाढविण्यात आले आहे. मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ऑक्सिजन साठा उपलब्ध झाल्यानंतर कोरोना वॉर्ड सुरु केला जाणार आहे, अशी माहिती फडणवीस यांना दिल्याचे डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, रियाज शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, खासदार भारती पवार, आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com