भेदभाव विसरून विकासकामे : आ. पवार

विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण
भेदभाव विसरून विकासकामे : आ. पवार

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

जो विकास करतो त्याच्या पाठीशी उभे राहा. आम्ही पक्ष भेदभाव विसरून काम करतो, असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी केले. आमझर येथे कळवण-सुरगाणा मतदार संघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ. पवार बोलत होते.

यावेळी राष्ट्रावादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, राजेंद्र पवार, रणजित गावित, राजेंद्र गावित, नवसू गायकवाड, आनंदा झिरवाळ, युवराज लोखंडे, सुरेश चौधरी, माधव पवार, ज्योतिंग बागुल, मधुकर चौरे, राजू गांगोडा, भास्कर अलबाड, कृष्णा बोरसे, तुकाराम देशमुख, रामदास केंगा, मजिद चौधरी, सावळीराम महाले, यशवंत चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी आ. नितीन पवार म्हणाले की, गेली चाळीस वर्षे ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी विकासाकडे डोळेझाक केली. लोकांना भूलथापा मारून विकासापासून वंचित ठेवले. जो काम करतो त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा.

विकास नेमका कोठे दडून बसला होता तो आता लोकांना गवसला आहे. सुरगाणा तालुका हा विकासापासून कोसो दूर आहे. शेती सिंचन, पिण्याचे शुद्ध पाणी सर्वांना उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी पुढील लढा द्यावा लागणार आहे. चिंतामण गावित यांनी सांगितले की, शिंदे व फडणवीस सरकारने पुढील वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये सुरगाणा तालुक्यातील रस्त्याचे एकही काम धरले नसून येथील आदिवासी जनतेवर अन्याय केला आहे.

याबाबतीत रस्ते, आरोग्य, पाणी, वीज, शिक्षण या समस्यांबाबत आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करावा लागणार आहे. तरुणांना विकास म्हणजे नेमके काय हे समजले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत. डोल्हारे ग्रामपंचायत अंतर्गत डोल्हारे येथे दशक्रिया विधी शेड, गावातील नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत, सामाजिक सभागृह, सुभाषनगर येथे व्यायामशाळा, गावितपाडा येथे स्मशानभूमी शेड, नळ पाणीपुरवठा तसेच सुभाषनगरजवळ सिमेंट काँक्रिट बंधारा बांधणे

याचप्रमाणे सतखांब, आंबाठा, वडाचा पाडा, पालविहीर, करवंदे, तळपाडा, सुरगाणा, भदर, सातबाभळ, चापापाडा, करंजूल (सु.), सूर्यगड, पातळी, खोकरी, जांभूळपाडा, कोठुळे, दातरीचा पाडा, काठीपाडा, खांदुर्डी, हनुमंतपाडा, चापावाडी, पायरपाडा, गाळबारी, कृष्णनगर, दोडीपाडा, म्हैसखडक, उंबरठाण, निंबारपाडा, मोतीबाग (राशा), भुसीपाडा, देऊळपाडा, साळीपाडा, डोंगरपाडा इत्यादी ठिकाणी नळ पाणीपुरवठा, रस्ते, सभागृह, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ता, स्मशानभूमी शेड, सिमेंट काँक्रिट बंधारे, सार्वजनिक विहीर, शाळा इमारत, दशक्रिया विधी शेड, व्यायामशाळा, सांस्कृतिक संकुल इत्यादीमधून काही विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

एकूण 31 कोटी 55 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमझर येथील मनोज वाघमारे, श्रावण वाघमारे, हरी वाघमारे, दत्तू वाघमारे, नारायण पवार यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com