पेठ । Peth (प्रतिनिधी)

पेठ नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होण्याच्या अंतिम टप्प्यात शहरातील कित्येक महिने रखडलेली रस्त्यांची कामे उरकण्याची लगीनघाई सुरू झाली आहे.

सत्तेचा सोपान आपल्याच हाती राहण्यासाठी विद्यमान मंडळाने गेल्या पाच वर्षांपासून येनकेन प्रकारे अपूर्ण ठेवलेली कामे दिवस-रात्र उरकण्याचा सपाटा लावला आहे.

यापूर्वी झालेली रस्त्यांची, गटारीची कामे शेवटचा श्वास घेत असताना यावेळी मात्र खास काँक्रिट मिक्सर मागवून रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत.

मुदत संपलेल्या कामांची मुदत वाढवून देण्याचे कायदेशीर सोपस्कार पाडण्यात आले किंवा नाही याची माहिती उपलब्ध नाही किंवा कुठलीही नियंत्रक यंत्रणाही त्यावर लक्ष ठेवताना दिसत नाही.

मात्र अंतर्गत रस्त्यांची कामे तशीच अर्धवट स्थितीत पडून आहेत.