विकासकामे हेच माझे ध्येय : आ. नितीन पवार

विकासकामे हेच माझे ध्येय : आ. नितीन पवार

कळवण । प्रतिनिधी Kalwan

स्व. ए. टी. पवार यांनी विकासकामांची शिकवण दिली आहे. त्यामुळे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात निधी मंजूर करण्यात यश आले. अर्थसंकल्प, नाबार्ड, आदिवासी उपयोजना, ठक्कर बाप्पा, रस्ते व पूल दुरुस्ती, डोंगरी विकास, जनसुविधा, मूलभूत योजना व आमदार निधी या वेगवेगळ्या योजनांमधून 93 कोटी 70 लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात यश आले. त्यामुळे प्रत्येक गावात विकासकामे ( Development work ) करणे हेच माझे ध्येय आहे, अशी ग्वाही आ. नितीन पवार ( MLA Nitin Pawar )यांनी दिली.

कळवण तालुक्यातील 93 कोटी 70 लाख रुपयांच्या मंजूर कामांतर्गत दरेगाव वणी, चिखली, कळवण खुर्द, मानूर, जिरवाडे, शिरसमणी, ओतूर, भुसणी, निवाणे, भेंडी, कळवण येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आ. पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद गटनेते यशवंत गवळी, बाजार समिती सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, उपसभापती विजय शिरसाठ, भूषण पगार, हेमंत पाटील, संतोष देशमुख, शिवाजी चौरे, अतुल देवरे, विलास रौंदळ, सुनील देवरे आदी उपस्थित होते.

यावेळी दरेगाव वणी, चिखलीपाडा येथे सभामंडप बांधकाम करणे, साकोरेपाडा येथे संरक्षक भिंत बांधकाम करणे, कोल्हापूर फाटा ते कळवण खु. रस्त्याचे बांधकाम करणे, वरवंडी रस्ता बांधकाम करणे, भेंडी येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, जुनी भेंडी रस्ता बांधकाम करणे, भेंडी फाटा ते देवरे वस्ती रस्ता बांधकाम करणे आदी कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा करण्यात आला.

कार्यक्रमास नामदेव खैरनार, बळीराम देवरे, रविकांत सोनवणे, प्रकाश राऊत, जिभाऊ वाघ, बापू सावकार, दिगंबर पवार, बी. एन. पगार, परशुराम शिंदे, बाजीराव शिंदे, केदा सोनवणे, नितीन वाघ, हिरामण वाघ, सागर खैरनार आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com