नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी सुरत- नाशिक -चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाला मंजुरी दिली आहे. यामुळे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील आदिवासी भागाचाही विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास खा. डॉ भारती पवार यांनी व्यक्त केला आहे .

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत बोलताना महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रस्ते बांधणी प्रकल्पांना मजुरी दिली.त्यात प्रामुख्याने सुरत -नाशिक-अहमदनगर -चेन्नईअशा ग्रीन फिल्ड महामार्गाला मंजुरी दिली .

यामुळे उत्तरेकडील वाहनांचा लोंढा मुंबईला न जाता दक्षिणेला जाईल.त्यामुळे उत्तर दक्षिणेकडील जिल्ह्यांची वाहतूक वेगाने होण्यास मदत मिळणार आहे. तसेच ह्या महामार्गामुळे सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड ह्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील आदिवासी भागाचाही विकास होण्यास मदत होऊन येथील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.

तसेच कांदा उत्पादक ,द्राक्ष उत्पादक शेतकरी ,व्यापारी यांनाही मोठा फायदा होणार आहे .ही वाहतूक अधिक जलद होणार असल्याने वेळेची व इंधनाचीही बचत होणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात या महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. असेही खा डॉ भारती पवार यांनी सांगितले. या महामार्गास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने खा .डॉ पवार यांनी आभार मानून अभिनंदन केले.