समाजकारणातून विकासाला दिशा मिळावी : श्रीराम शेटे

नितीन गांगुर्डे यांना कादवा प्रतिष्ठानचा ‘जलदूत’ पुरस्कार
समाजकारणातून विकासाला दिशा मिळावी :  श्रीराम शेटे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘कादवा प्रतिष्ठान Kadva Pratishhan समाजसेवा करणार्‍या कार्यकर्त्यांना पुरस्कारांच्या माध्यमातून उर्जा देण्याचे काम करीत आहे. सामाजिक कार्यकर्ते ही एक शक्ति आहे.समाजकारणातुन समाजाला दिशा देण्याचे काम पुरस्कार्थी सामाजिक कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे Chairman of the Kadva factory - shriram shete यांनी केेले. कादवा शिवार प्रतिष्ठानच्या 2019-20 चा या वर्षातील पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्रीराम शेटे बोलत होते.

यावेळी विविध क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. दैनिक देशदुत दिंडोरी विभागीय कार्यालयाचे प्रमुख नितीन गांगुर्डे यांना कादवा चेअरमन श्रीराम शेटे, प्रसिध्द साहित्यिक डॉ. तौर यांच्या हस्ते ‘जलदुत’ पुरस्काराने Jaldoot Award सन्मानित करण्यात आले. नितीन गांगुर्डे यांनी पश्चिम आदिवासी भागात पाणीप्रश्नावर काम केल्याने जलदुत पुरस्कार श्रीराम शेटे, गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नांदेडच्या रामानंद विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख, प्रसिध्द साहित्यिक प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी साहित्यावर मनोगत व्यक्त केले.

गीतकार बाबासाहेब सौदागर, डॉ. यशवंतराव पाटील, कादवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, सरचिटणीस विठ्ठलराव संधान, सोलापूर विद्यापीठाचे शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. तौर यांना मानाचा ‘ साहित्य साधना’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विठ्ठलराव संधान म्हणाले की, ग्रामीण भागात साहित्य चळवळ नाशिकमध्ये आली आहे. हा परमोच्च आनंदाचा क्षण आहे.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात कादवा शिवार प्रतिष्ठानच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजयकुमार मिठे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक उगलमुगले यांनी केले. मानपत्राचे वाचन राजेंद्र उगले यांनी केले. आभार सुरेखा बोर्‍हाडे यांनी मानले. यावेळी दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात नागरिक उपस्थित होते.

कादवा प्रतिष्ठान सन्मान: नरहरी झिरवाळ (राजकीय), हंसराज देशमुख (उद्योंजक), नितीन गांगुर्डे (जलदूत), भगवान गायकवाड (पत्रकारिता), ज्ञानेश्वर गणोरे (कृषी), किरण सोनार (सामाजिक), विलास जमदडे (शैक्षणिक), नितीन झगरे (सांस्कृतिक), जी. आर. आढाव (प्रशासकीय), डॉ. दीपक बागमार (वैद्यकीय), सुरेश कळमकर ( कृषी), कादवा प्रतिष्ठान 2019 पुरस्कार - प्रा. साईनाथ पाचारणे, विशाल इंगोले, भीमराव वाघचौरे, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. उर्मिला चाकुरकर, विठ्ठल जाधव, पालखेड बंधारा वाचनालयाचे पुरस्कार :- बाळासाहेब लभडे, सुनील जाधव, संदीप जगदाळे, डॉ. राजेश गायकवाड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com