शहरात विकासपर्वास प्रारंभ: भुसे

भेदभावाची टिका राजकीय हेतूने; विकासासाठी समन्वय हवा
शहरात विकासपर्वास प्रारंभ: भुसे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

पुर्व-पश्चिम असा भेदभाव (Discrimination) न ठेवता संपुर्ण शहराचा विकास (Development of the city) करणे हेच आपले ध्येय्य राहिले आहे.

शहरातील बाह्य व मध्य या दोन्ही मतदार संघातील पुर्णत्वास नेण्यासाठी शासनाकडे आपला पाठपुरावा सुरू असल्यानेच शंभर कोटी निधीतील (fund) विकासकामांना (Development works) प्रारंभ होवू शकला आहे.

संपुर्ण शहरात विकासाचे पर्व सुरू झाले असल्याने मध्य भागावर अन्याय केला जात आहे अशी अफवा पसरविणे योग्य नाही. टिका करणार्‍यांनी राजकारण (politics) न करता विकासासाठी समन्वयाची (coordination) भुमिका घेणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी बोलतांना केले. शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मनपास मंजूर झालेल्या शंभर कोटी निधीतून शहरातील प्रमुख 19 मार्गांसह मोसम नदीवरील संगमेश्वर, श्रीराम नगर भागातील तीन ठिकाणी पुलांच्या कामाचे भुमीपूजन (bhumipujan) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. मध्यचे आ. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, मनपा आयुक्त गोसावी, माजी उपमहापौर नीलेश आहेर, सखाराम घोडके, मामको चेअरमन राजेंद्र भोसले, मनोहर बच्छाव, अ‍ॅड. संजय दुसाने, भिमा भडांगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष लकी गिल, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार, रिपाइं जिल्हाप्रमुख भारत जगताप, तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे, डॉ. जतीन कापडणीस, भरत देवरे, नंदकिशोर मोरे, भिकन शेळके, शहर अभियंता कैलास बच्छाव, माळवाळ, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

शहराच्या प्रवेशव्दारांपासून विकासाचे पर्व सुरू झाले आहे. संपुर्ण शहराचा चौफेर विकास (Development) साधला जाणार असल्याने आगामी वर्ष मालेगावसाठी (malegaon) सुवर्णक्षरांनी नोंद करण्यासारखे राहणार असल्याचे स्पष्ट करीत भुसे पुढे म्हणाले, शासनाच्या निधीतून होत असलेली विकासकामे दर्जेदार होण्याच्या दृष्टीकोनातून लक्ष दिले जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Shinde) यांनी मालेगाव शहरासाठी ते नगरविकास मंत्री असतांना मार्च महिन्यात शंभर कोटींचा विकास निधी (Development Fund) देण्याचे आश्वासन दिले होते.

आज होत असलेल्या भुमीपूजन समारंभातून शिंदे यांनी दिलेल्या शब्दांची पुर्तता झाली आहे. मोसम नदीवरील सांडवा व द्याने, श्रीरामनगर येथे साकारण्यात येणार्‍या नवीन पुलांमुळे पुर परिस्थितीमुळे निर्माण होणारी नागरीकांची मोठी गैरसोय दूर असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरासाठी अमृत योजना टप्पा दोन अंतर्गत भुयारी गटार योजनेच्या पाचशे कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार असून त्याची तांत्रिक मंजुरी देखील अंतीम टप्प्यात आली आहे.

सदरची मंजुरी मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून हा प्रस्ताव मंजुर होताच संपुर्ण शहरात भुयारी गटार (Underground sewers) कार्यान्वित होवून नागरीकांच्या आरोग्याचा (health) प्रश्न देखील सुटण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे स्पष्ट करत भुसे पुढे म्हणाले. मालेगाव बाह्य व मध्य या दोन्ही मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शासनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून भरीव सहाय्य करण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे शहर व तालुक्याच्या विकासासाठी निधी पडणार नाही याची दक्षता आपण घेवू, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.

विकासकामांमध्ये मध्य मतदार संघावर अन्याय होत असल्याची टिका करणार्‍यांचा पालकमंत्री भुसे यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. विकासकामांमध्ये आजपर्यंत आपण भेदभाव केलेला नाही. दोन्ही मतदार संघाचा विकास करत आहोत. टिका करणार्‍यांनी राजकारण न करता विकासाच्या मुद्यावर समन्वयाची भुमिका घेतली अशी अपेक्षा भुसे यांनी शेवटी बोलतांना व्यक्त केली.

कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल देवरे, रिपाइं शहराध्यक्ष विकास केदारे, ओम गगराणी, राजेंद्र जहाँगिरदार, अरविंद पवार, प्रकाश अहिरे, सुनिल यशोद, राजेंद्र अहिरे, प्रभाग अभियंता महेश गांगुर्डे आदींसह शिवसेना, भाजप, रिपाइं कार्यकर्त्यांसह शहरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com