दायित्व निधीतून शाळांचा विकास - कृषीमंत्री भुसे

दायित्व निधीतून शाळांचा विकास - कृषीमंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोनाच्या Corona आर्थिक संकटात जिल्हा परिषदेच्या शाळा Zilla Parishad Schools दुरुस्ती अथवा नवीन इमारत बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला नसला तरी सामाजिक दायित्व निधीच्या liability fund माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक विकास साधाणार असल्याची भावना कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी व्यक्त केली. तालुक्यातील सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून एकूण 20 वर्गखोल्यांचे भूमीपूजन दादा भुसे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कार्यकारी अभियंता एस.एम. देवरे, सरपंच पंडीत देसले, पं.स. सभापती सुवर्णा देसले, जि.प. व पं. स. सदस्य, भिकन शेळके, कमलाकर देसले, दीपक देसले, भालचंद्र देसले, मख्याध्यापक ओगले, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासन करोनामुळे आर्थिक संकटात असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती अथवा नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध न झाल्याने, जिल्हा परिषदेंच्या शाळाची अवस्था बिकट झाल्याचे सांगतांना ना. भुसे म्हणाले, या शाळांमध्ये सर्वसामान्य पालकांची मुले शिक्षणासाठी येतात. या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. शासन पातळीवरही निधी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. यंदाच्या वर्षात जवळपास सात ते आठ नवीन शाळा बांधायला घेत असून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून नवीन वर्ग खोल्यांचे काम उभारण्यात येणार असल्याची माहिती ना. भुसे यांनी यावेळी दिली.

ज्ञानदानाचे चांगले कार्य शिक्षक बांधवांनी करावे, आदर्श विद्यार्थी घडवावे असे ना. भुसे यांनी सांगतांना, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सामाजिक दायित्व निधीतून मंजूर वर्गखोली बांधकामाचा भूमिपूजन मालेगाव तालुक्यातील साजवहाळ येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साजवहाळ 6 वर्ग खोल्या 59.98 लाख रूपये, जिल्हा परिषद शाळा झोडगे 8 वर्ग खोल्या 50 लाख रुपये, जिल्हा परिषद लेंडाणे 4 वर्ग खोल्या 50 लाख रुपयांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी केले.

यावेळी त्यांनी साजवहाळ येथे ग्रामपंचायत साजवहाळच्या नुतन वास्तूचे लोकार्पण केले. ना. भुसे यांनी जि.प. शाळांच्या विकासासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची जनतेला माहिती दिली. तसेच साजवहाळ ग्रामस्थांचे सहकार्य व शालेय प्रशासनचा पाठपुरावा या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास घडत असल्याचे सांगतांना, करोना काळातील ओट्यावरची शाळा या उपक्रमाचे कौतुकही त्यांनी केले. शालेय गुणवत्तेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी शुभेच्छा देत मंत्री स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही ना. भुसे यांनी यावेळी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com