देवमामलेदार स्मारकाचे काम नित्कृष्ट?

चौकशी व ठेकेदारावर कारवाईसाठी माजी नगरसेवकाचे आमरण उपोषण
देवमामलेदार स्मारकाचे काम नित्कृष्ट?

सटाणा । प्रतिनिधी | Satana

शहरातील देव मामलेदार (Dev Mamledar) श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या (Shri Yashwantrao Maharaj Memorial) निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी (inquiry of work) करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई (legal action) करण्यात यावी

या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांनी आजपासून नगरपालिका कार्यालयाच्या (Municipal Office) प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास (hunger strike) प्रारंभ केला आहे.

देव मामलेदार यशवंतराव महाराज सटाणा शहरात (satana city) मामलेदार म्हणून कार्यरत असताना असलेल्या तत्कालीन शासकीय कार्यालयाचे जतन करून महाराजांचे स्मारक करण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी शासनाकडे केलेली होती. त्या अनुषंगाने शासनाच्या पर्यटन विकास विभागामार्फत (Department of Tourism Development) चार कोटी 75 लाख रुपयांचा निधी (fund) या कामासाठी मंजूर करण्यात आलेला आहे.

दरम्यान सदरचे स्मारकाच्या कामाचा ठेका धुळे (dhule) येथील इशिता इन्फ्रास्ट्रक्चरला (Ishita Infrastructure) देण्यात आला आहे. मात्र सुरुवातीलाच केलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून प्रत्यक्षात दोन ते तीन लाखांचे काम झालेले असताना 16 लाख रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्ते मनोज सोनवणे यांनी केला आहे. संपूर्ण देशात शासकीय अधिकारी म्हणून सेवाभावी वृत्तीने कामकाज करणार्‍या शासकीय अधिकार्‍याचे एकमेव मंदिर जिल्ह्यातील सटाणा शहरात आहे.

दरवर्षी डिसेंबर महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरत असून पंचक्रोशीतील हजारो भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. शासकीय अधिकार्‍यांना प्रेरणास्थान असणार्‍या देव मामलेदार महाराजांच्या मंदिरास सर्व स्तरातील शासकीय वरिष्ठ अधिकारीही भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर शहरात देव मामलेदारांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळोवेळी शासनाकडे भरीव अशा निधीची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री (Union Minister of State for Defence) व विद्यमान खा.डॉ. सुभाष भामरे (MP Dr. Subhash Bhamre) यांच्या प्रयत्नातून व तत्कालीन पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल (Former Tourism Development Minister Jayakumar Rawal) यांच्या माध्यमातून या स्मारकासाठी चार कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र प्रारंभीचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी यासाठी आमरण उपोषण (hunger strike) सुरू केल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

दरम्यान सटाणा पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी उपोषणकर्ते सोनवणे यांची भेट घेऊन संबंधित ठेकेदारावर 48 हजार 900 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून गुणवत्ता व नियंत्रण विभाग नाशिक यांचे मार्फत झालेल्या कामाचे लेखापरीक्षण करण्याकरिता कार्यवाही करण्यात आल्याचे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र संबंधित ठेकेदार व तत्कालीन नगराध्यक्ष यांच्यावर प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे उपोषण करते सोनवणे यांनी सूचित केले आहे.

दरम्यान माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, समको बँके माजी चेअरमन श्रीधर कोठावदे, संचालक जगदीश मुंडावरे, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष किशोर कदम, शिवसेना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, शरद शेवाळे, राजनसिंग चौधरी, माजी नगरसेवक भरत काटके, ज्येष्ठ नेते दगाबापू सोनवणे, दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष नाना कुमावत, युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुमीत वाघ, साहेबराव सोनवणे आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com