देवळालीकरांचे आरोग्य रामभरोसे: निकम

देवळालीकरांचे आरोग्य रामभरोसे: निकम

दे. कॅम्प । वार्ताहर | Deolali Camp

पावसामुळे (rain) रस्त्यात पडलेले खड्डे (potholes), उडणारी धूळ (dust), डबक्यात साचलेले पाणी व निर्माण होत असलेले जंतू यामुळे देवळाली कॅम्पकरांचे आरोग्य (health) धोक्यात येऊ पाहत असल्याने

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने (Cantonment Administration) याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी रिपाई शहर अध्यक्ष सुरेश निकम (RPI City President Suresh Nikam) व कटारे फाउंडेशनचे संतोष कटारे यांनी केली आहे. ‘स्वच्छ देवळाली सुंदर देवळाली’ यामुळे देशभरात देवळालीची प्रतिमा उंचावली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देवळालीचे आरोग्य बिघडले असून रस्त्यांत मोठमोठे खड्डे पडले आहेत.

लॅमरोड, आनंद रोड, हौसन रोड, रेस्टकॅम्प रोड, वडनेर रोड, धोंडी रोड या महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सध्या डांबर बंद असल्याने नव्याने रस्ते निर्माण (road work) करणे शक्य नसले तरी मुरुम, खडीच्या साहाय्याने खड्डे (potholes) बुजवले जाऊ शकतात. त्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.

डबक्यात साचणारे पाणी व निर्माण होणारे डास यामुळे साथीच्या रोगांचा फैलाव (Spread of Epidemic Diseases) झपाट्याने होत आहे. पूर्वी अशा खड्ड्यांमध्ये दररोज औषध फवारणी केली जात असे. मात्र सध्या या दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी रिपाइंचे शहराध्यक्ष सुरेश निकम, कटारे फाऊंडेशनचे संस्थापक संतोष कटारे यासह रवींद्र गांगुर्डे, शिवराज मोरे, बोमी गांगुर्डे आदींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com