'देव द्या देवपण घ्या' उपक्रमाचे यंदा सलग ११ वे वर्ष

'देव द्या देवपण घ्या' उपक्रमाचे यंदा सलग ११ वे वर्ष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घरगुती गणेशोत्सवातील (Ganeshotsav) दीड दिवसाच्या गणपती मूर्तींचे संकलन करून “देव द्या, देवपण घ्या” या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे....

गोदावरीचे (Godavari River) प्रदूषण (Pollution) थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने (Vidyarthi Kruti Samiti) गेल्या १० वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची उत्साहात सुरुवात झाल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार (Akash Pagar) यांनी दिली.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster Of Paris) गणेशमूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरीचे मोठया प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून गेल्या सलग १० वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो.

यंदाचे या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. गतवर्षी हजारो गणेश मूर्ती नाशिककरांनी देव द्या देवपण घ्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थी कृती समितीकडे सुपूर्द केल्या होत्या. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) सहकार्याने कृत्रिम तलावात (Artificial Pond) विधिवत विसर्जित केल्या जातात.

गोदावरी नदी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी देव द्या देवपण घ्या या उपक्रमात नाशिककरांनी मोठया संख्येने सहभागी होऊन गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दीड दिवसांच्या गणपती संकलनासाठी विशाल गांगुर्डे, सोनू जाधव, रोहित कळमकर, सागर बाविस्कर, जयंत सोनवणे, तुषार गायकवाड, युवराज कुरकुरे, राहुल मकवाना, भावेश पवार, सिद्धांत आमले, केदार कुरकुरे, संकेत वानखडे, प्रशांत खंडाळकर, संकेत निमसे आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com