सर्वच निवडणुका लढविण्याचा निर्धार

सर्वच निवडणुका लढविण्याचा निर्धार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सर्वच निवडणुका (election) ह्या संंपुर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या (national republican party) बैटकीत व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक (core committee meeting) नाशिक येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे (Annasaheb Katare) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

त्यात महानगरपालिका (municipal corporation), नगरपालिका (municipality), जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समिती (panchayat samiti), कॅन्टोन्मेंट बोर्ड (cantonment board) आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक निवडणुकाच्या दृष्टीने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला. बैठकीस महाराष्ट्रातील (maharashtra) सर्वच जिल्ह्यातून पदाधिकारी नेते उपस्थित होते.

चर्चेत प्रवक्ते गिरीष अकोलकर, कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रदीप रोकडे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन साबळे, रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश खराटे, ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकरे, सातारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग अहिवाळे, मुंबई प्रदेश महासचिव सचिन नांगरे, आरिफ शेख सहभागी झाले होते. बैठीकचे आयोजन नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे, जितू बागुल, राजू लोखंडे, प्रशांत कटारे,संगीता उन्हवणे, मनोहर दोंदे आदिंनी केले होते.

Related Stories

No stories found.