नाशिक । प्रतिनिधी

काळानुरूप जीवनशैली बदलत असली तरी काही गोष्टी त्याला अपवाद असतात. त्याचेच उदाहरण म्हणजे भारतीय लोकांना असलेली सोन्या-चांदीच्या दागिन्यांची हौस! सोन्याचे दागिने हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय! वर्षानुवर्षे विविध प्रकारचे दागिने बनवण्यात अनेक दुकाने ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नाशिकमधील सुप्रसिद्ध पोहुमल ज्वेलर्स!

1932 पासून पोहुमल पंजवानी यांनी गावागावात जाऊन दागिने विकण्यास सुरुवात केली. 21 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर पुढे व्यवसायात जम बसला. त्यानंतर त्यांच्या पुढील पिढ्यांनी 1953 मध्ये नाशिकच्या सराफ बाजारात मपोहुमल अँड सन्स नावाने चांदीचे होलसेल दुकान सुरू केले. मपोहुमल ज्वेलर्सला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्यांनी नाशिककरांना आकर्षक व हॉलमार्क असलेले अनेक प्रकारचे दागिने दिले व विश्वास संपादन केला. आता त्यांची सर्वात अलीकडील पिढी असलेले वीरेन पंजवानी यांनी 2 वर्षापूर्वी कॉलेज रोड येथे पोहुमल ज्वेलर्सची नवीन शाखा सुरू केली. वीरेन यांनी आपल्या परंपरागत व्यवसायात जाण्याचे आधीपासूनच ठरवले होते.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत जाऊन त्यांनी डायमंड कोर्स केला. त्यात त्यांनी सुवर्णपदक जिंकले. हिर्याच्या संदर्भातील सर्व बारकावे त्यांना तेथे शिकण्यास मिळाले. दागिन्यांचे आधुनिक व नवनवीन प्रकार ते शिकले. अशा प्रकारे ज्वेलरी संदर्भातील सर्व प्रकारचे शिक्षण व बारकावे अभ्यासाल्यानंतर वीरेन यांनी भव्य शोरुमची स्थापना केली.

कॉलेज रोड येथे अत्याधुनिक प्रकारच्या शोरुममध्ये सोने, चांदी, हिरे, मोती, विविध रंगांचे मौल्यवान खडे, मणी, धातू आदींपासून बनवण्यात येणारे दागिन्यांचे असंख्य प्रकार ग्राहकांना खरेदीस उपलब्ध आहेत. सोने-चांदीचे दागिने तर येथे मिळतातच; पण एक स्वतंत्र मजला खास आर्ट ज्वेलरीच्या चाहत्यांसाठी उपलब्ध आहे.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ट्रेण्ड सतत बदलत असतो. बाजारात सतत बदलणारे ट्रेंडस् आणि ग्राहकांची आवड लक्षात घेऊऩ नवनवीन कलेक्शन सादर करणे सराफा व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते, त्यामुळे ग्राहकांना सतत उत्तमातली उत्तम डिझाईन्स देणे याकडे आपण लक्ष पुरवत आहोत.

काळानुसार दागिन्यांमध्ये बदललेली मागणी पूर्ण करण्यावर आपला भर असल्याचे वीरेन आवर्जून सांगतात. स्वतःच्या हिंमतीवर आणि मेहनतीवर त्यांनी या व्यवसायात जम बसवला आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व तरुणांना प्रेरणादायी ठरावे असेच आहे.

अपेक्षित लक्ष्य निश्चित करून वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. यश मिळतेच; मात्र ते मिळवण्याची जिद्द माणसाच्या अंगी असावी. तरुणांनी योग्य वयातच करिअर करणे गरजेचे आहे.

वीरेन पंजवानी, संचालक, पोहुमल ज्वेलर्स.