कसबे सुकेणे ग्रामस्थांचा निर्धार; वाईटपणा घेऊ पण गाव वाचवू

कसबे सुकेणे ग्रामस्थांचा निर्धार; वाईटपणा घेऊ पण गाव वाचवू
USER

कसबे सुकेणे । Kasbe sukene (वार्ताहर)

येथील करोना ग्रामसमितीने वाईटपणा घेणार मात्र गाव वाचणारच अशी धडक भूमिका घेऊन तालुक्यात एक मोठे व आदर्श गाव म्हणून संकटकाळी करोनाकाळात पुढे येण्याचा मानस ठरवला आहे.

शासनाने 15 तारखेपासून संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन सुरू केले आहे. कसबे सुकेणे परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. करोनामुळे मृत्युदर वाढत आहे.

तरीही काही लोक व व्यावसायिक बेपर्वाईने वागत आहेत. म्हणून कसबे सुकेणे ग्रामपालिकेने व करोना समितीने शासनाच्या नियमांचे पालन करून उलट शासनाच्या पुढे एक पाऊल टाकून सलग पाच दिवस दवाखाने व मेडिकल वगळता अत्यावश्यक सेवा बंद ठेवून जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचे पालन न करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक व गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असले तरी छोट्या-मोठ्या अत्यावश्यक सेवेत असणार्‍या घटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र करोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या कसबे सुकेणे ग्रामपालिका व करोना समितीने गाव वाचवण्याच्या दृष्टीने सलग पाच दिवस जनता कर्फ्यू पाळून व्यापार्‍यांचा रोष असला तरी सर्वसामान्य लोकांना करोनापासून वाचवणे, करोनाची चेन ब्रेक करणे ही भूमिका बाळगली आहे.

त्या दृष्टिकोनातून सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनराज भंडारे, ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे, तलाठी सुरुडे व कल्पना पवार, नोडल अधिकारी एकनाथ पगार, डॉ. विजय औसरकर, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. व्यवहारे आदींसह करोना समितीचे सदस्य सुहास भार्गवे, छगन जाधव, सोमनाथ भागवत, रमेश जाधव, अतुल भंडारे, छबू काळे, बाळू कर्डक, शिल्पा जाधव, ज्योती भंडारे, मनीषा भंडारे, सविता जाधव, सुरेखा औसरकर, सरला धुळे, आरती कर्डक, छाया गांगुर्डे, अबेदा सय्यद आदींसह ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com