
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलची (Junior Chamber International) (JCI) झोन आणि अध्यक्षांसाठी प्रेसिडेन्शिअल अकॅडमीचे (Presidential Academy) तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
7 राज्यातील कार्यशाळेत सहभागी झालेले जेसीआयच्या 125 अध्यक्षांनी देशभरात एक लाख सदस्य नोंदणीचा (Member registration) निर्धार यावेळी केला. जेसीआय ग्रेपसिटीच्यावतीने (JCI Grapecity) या कार्यशाळेचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले. उदघाटन जेसीआय इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. कार्तिकेयन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रेसिडेन्शियल अकॅडमी 2023 ची चेअरमनशिप नॅशनल व्हाइस प्रेसिडंट जितेंद्र मान यांनी भूषविली.
प्रशिक्षण कार्यशाळेसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून मागील वर्षीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंशू सराफ, सह प्रशिक्षक अनुपम तिवारी आणि विकास गुगलिया यांनी सर्व अध्याय अध्यक्षांना तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन दिले. प्रशिक्षण कार्यशाळेच्या (Training workshops) सांगता समारंभ वेळी जेसीआय इंडियाचे फाउंडेशन डायरेक्टर जेसी नंदू बरडिया यांनी सर्व प्रशिक्षणार्थी अध्यक्षांना यावेळी मार्गदर्शन केले.
झोन 13 चे अध्यक्ष जितेंद्र बोरा यांनी पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आखणी केली.जेसीआय ग्रेपसिटीचे प्रफुल पारख यांनी यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन दिले. गतवर्षीचे प्रेसिडेंट विनायक पाटील आणि गौरव धाकराव यांनी या कार्यक्रमासाठी बहुमूल्य योगदान दिले. सुनील रोकडे यांनी कार्यक्रमाचे होस्ट प्रेसिडेंट म्हणून काम प्रशिक्षण कार्यक्रम पाडण्यासाठी जेसीआय ग्रेपसिटीचे प्रेसिडेंट यांनी विशेष प्रयत्न केले.