पाडव्याच्या दिवशी विषमुक्त शेतीचा संकल्प

पाडव्याच्या दिवशी विषमुक्त शेतीचा संकल्प

कसबे सुकेणे। वार्ताहर | Kasbe Sukene

मौजे सुकेणे (Sukene) येथील प्रगतिशील शेतकरी शाम सिताराम मोगल (Progressive farmer Sham Sitaram Mughal) यांनी नववर्ष दिनी अनोखी गुढी (gudi) उभारून मराठी नववर्ष दिन (Marathi New Year) आपल्या कुटुंबासमवेत साजरा केला. यावेळी आपली शेती विषमुक्त (Toxins free Agriculture) करून विषमुक्त अन्नधान्य व भाजीपाला पिकवण्याचा (Non-toxic food grains and vegetable crops) संकल्प त्यांनी केला.

आज आपल्या शेतीतच त्यांनी विषमुक्त शेती प्रयोगाची (Non-toxic farming experiment) अनोखी गुढी उभारून आपल्या बैलांना बैलपोळा प्रमाणे सजवून अंगावरती झुली टाकून कुटुंबासमवेत आपल्या शेतीचे दर्शन घेऊन वर्षभर विषमुक्त शेती, अन्नधान्य व भाजीपाला पिकविण्याचा संकल्पच कुटुंबासमवेत सोडला. शाम मोगल व त्यांचे कुटुंबीय गेल्या चार ते पाच वर्षापासून विषमुक्त शेती करत असून त्यात गहू, भाजीपाला, ऊस, द्राक्ष यांचा समावेश असून या सर्व पिकांची मशागत बैलांच्या सहाय्याने करून विषमुक्त पिके (Toxin free crops) पिकवली जातात.

बाजारपेठेत त्यांनी एक उत्तम ब्रॅण्ड (brand) तयार केला असून त्यांच्या भाजीपाला (Vegetables) व अन्नधान्याला मोठी मागणी आहे. आधुनिक काळात यांत्रिक शेतीबरोबरच रासायनिक खते व कीटकनाशकांचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात येत असून यावर उपाय म्हणून केवळ विषमुक्त शेती हीच काळाची गरज असल्याचे मोगल म्हणाले.

Related Stories

No stories found.