निधी मंजूर होऊनही रस्ता कामाला मुहूर्त नाही

निधी मंजूर होऊनही रस्ता कामाला मुहूर्त नाही

म्हाळसाकोरे । वार्ताहर | Mhalasakore

म्हाळसाकोरे (Mhalasakore) ते तारुखेडले (Tarukhedale) या 4 कि.मी. अंतराच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे (potholes) पडल्याने रस्त्यावर अपघाताचे (accidents) प्रमाण वाढले आहे. या रस्त्यासाठी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State for Family Welfare and Health Bharti Pawar) यांनी निधी मंजूर (Funding approved) करून रस्त्याचे भुमिपूजन (bhumipujan) देखील झाले आहे. मात्र प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला (road work) सुरुवात झाली नसल्याने आता हा रस्ता होणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

म्हाळसाकोरे-तारूखेडले या रस्त्यालगत नांदूरमध्यमेश्वर धरणाचा (Nandurmadhyameshwar dam) उजवा कालवा गेला आहे. या कालव्यामुळे शिवारात राहणार्‍या शेतकर्‍यांच्या (farmers) पाईपलाईन रस्त्यातुन गेल्याने या रस्त्याला नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातील अनेक पाईपलाईनच्या नाल्यांनी फुटापर्यंत खोली गाठली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास अवघड बनला आहे. परिसरात ऊसाचे मुबलक क्षेत्र आहे. परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ऊसाचा ट्रक, भाजीपाला, टेम्पो, ट्रॅक्टर, पिकअप यासारखी वाहने या रस्त्याने मालवाहतूक करण्याचे टाळू लागले आहे.

अनेकवेळा पाईपलाईन रस्त्यातच फुटत असल्याने रस्त्यावरील खड्डयात पाणी साचते. त्यातच या रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी रस्त्यावर अतिक्रमण (Encroachment) केले आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकरी हे रस्त्यालगत कांदा चाळी बांधणे, जनावरे बांधणे, उकिरडा तयार करणे आदींच्या सहाय्याने रस्त्याची रुंदी कमी करून ठेवली आहे. अनेक शेतकर्‍यांनी तर रस्त्यातच खिळे ठोकून जनावरे बांधणे सुरू केल्याने अनेक वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. सन 2006 मध्ये तत्कालीन आमदार अनिल कदम (MLA Anil Kadam) यांनी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण (Asphalting) केले होते.

परंतु त्याकडे विशेष लक्ष न दिल्याने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे 4 कि.मी. च्या या रस्त्यासाठी 35 ते 40 मिनिटे प्रवासासाठी खर्च करावा लागतो. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांपैकी हा एक म्हाळसाकोरे बाजारपेठेला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. खेडलेझुंगे बेट, ब्राम्हणवाडे, करंजी, तामसवाडी, तारुखेडले आदी गावांना जोडला जातो. त्यामुळे शेतकरी, वयोवृद्ध नागरिक, कॉलेज व शाळेतील मुले-मुली, आठवडे बाजार, बँका, खासगी संस्था, दूरसंचार कार्यालय, सरकारी दवाखाना, खासगी दवाखाना तसेच बससेवेला या खड्डयांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सदरचा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींच दुर्लक्ष तालुक्यातील गोदाकाठ भाग हा नेहमी राजकीय, सामाजिक आणि इतरही कुठल्या न कुठल्या विषयाने चर्चेत असतो. मात्र विकासाच्या बाबतीत या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. विशेष करून या भागातील रस्त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र नदीच्या अलिकडच्या भागावर नेहमी दुजाभाव केला जातो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

दत्ता आरोटे, ग्रा.पं. सदस्य (तामसवाडी)

Related Stories

No stories found.