महाजन उद्यानात उमटणार देशपांडे यांचे स्वर

महाजन उद्यानात उमटणार देशपांडे यांचे स्वर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या प्रमोद महाजन गार्डन ( Pramod Mahajan Garden ) येथे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे (Famous singer Rahul Deshpande) यांचे सुरेल स्वर गुरुवारी (दि.27) रोजी उमटणार आहे. आमदार देवयानी फरांदे ( MLA Devyani Farande )यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आ. फरांदे यांच्याकडून गेले अनेक वर्ष दिवाळी पहाट आयोजित केली जात आहे. अनेक सुप्रसिद्ध गायकांनी प्रमोद महाजन गार्डन येथे येऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलेले होते. पद्मजा फेनानी जोगळेकर, देवकी पंडित यासारख्या अग्रगण्य गायकांचा यात समावेश होता. करोनामुळे खंडित झालेल्या या परंपरेला या वर्षापासून पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. देशपांडे हे त्यातील सुप्रसिद्ध गायक असून शास्त्रीय संगीता बरोबरच भावगीत गायनात देखील त्यांचा हातखंड आहे.

सवाईगंधर्व संगीत महोत्सवात त्यांना प्रदान करण्यात आलेला रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार तसेच सुधीर फडके यांनी तरुण वयात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार. त्याच प्रकारे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परफॉर्मन्स दिले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचेे आवाहन आ. देवयानी फरांदे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com