देशदूत इम्पॅक्ट: विद्यार्थ्यांना तत्काळ दाखले वितरण

देशदूत इम्पॅक्ट: विद्यार्थ्यांना तत्काळ दाखले वितरण

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

समाजकल्याण विभागाकडून (Department of Social Welfare) महाविद्यालयांना शिष्यवृत्ती (scholarship) जमा न झाल्याने पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (students) पुढील शिक्षणासाठी (education) जाण्यासाठी महाविद्यालयाकडून शैक्षणिक दाखले (Educational certificates) अडविण्यात आल्याच्या तक्रारींवर त्वरित तोडगा काढून

विद्यार्थ्यांचे दाखले वितरित करण्यात यावे याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक देशदूतने (deshdoot) प्रसिध्द करताच त्या वृत्ताची दखल घेत शिष्यवृत्ती अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची (students) होणार नाही व त्यांना तत्काळ दाखले मिळतील, अशी ग्वाही महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य गायकवाड यांनी दिली आहे. नुकतेच महाविद्यालयीन परीक्षांचा निकाल लागलेला आहे.

पदवीच्या प्रथम व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात शिक्षण (education) घ्यायच्या असल्याने दाखल्यांची त्यांची मागणी नाही. त्यांचे शिक्षण चालू आहे परंतु पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची विभागांनी शिष्यवृत्ती जमा न केल्याने महाविद्यालयाने अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दाखला (Educational certificate) अडविण्यात आले होते. शाळेची फी भरा तरच दाखले मिळतील असा पवित्रा दिंडोरीच्या महाविद्यालयाने घेतल्याने विद्यार्थ्यांची धावपळ उडाली होती.

दिंडोरीच्या महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांची अडवणूक केली आहे. यामुळे त्यांचे पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना अडचण असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी दिंडोरीतून येत होत्या यावर सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले असून यावर तोडगा काढत सदोष शिष्यवृत्ती अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले देण्यात येतील, असे आश्वासन महाविद्यालयाने दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दैनिक देशदूतचे आभार मानले आहे.

समाजकल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. परंतू ती वेळेवर जमा होत नसल्याने महाविद्यालयाच्या यादीत सदर विद्यार्थी थकबाकीदारांमध्ये दिसतो. जर समाजकल्याण विभागाने वेळीच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा केली तर ही वेळ येणार नाही. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी तत्काळ बोलून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा आदेश दिले जाईल. जर शिष्यवृत्ती जमा करण्यास काही तांत्रिक अडचणी असतील तर महाविद्यालयांना पत्रव्यवहार करत विद्यार्थ्यांची अडवणूक होणार नाही. याची खबरदारी समाजकल्याण विभागाने घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी मी स्वत: पुुढाकार घेवू.

- नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य

दिंडोरी तालुक्यात गोरगरीब कुटूंबातील मुले शिक्षण घेत आहेत. विभागामार्फत या मुलांना शिष्यवृत्ती मिळत असते. परंतू ती वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. महाविद्यालयाकडे सदर विद्यार्थ्यांची बाकी दिसत असल्याने अशा अडचणी निर्माण होतात. तरी संबंधित विभागाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरीत जमा करावी. महाविद्यालयाकडूनही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाशी चर्चा झाली असून विद्यार्थ्यांना ते सहकार्य केले जाईल.

- प्रवीणनाना जाधव, संचालक मविप्र दिंडोरी-पेठ

समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांची जना न झाल्याने विद्यार्थ्यांना दाखले वितरीत करत असताना त्यांच्याकडे बाकी असल्याबाबत नोंद दिसते. त्यामुळे बाकी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले जाते. जर विद्यार्थ्यांनी सदोष शिष्यवृत्तीचा अर्ज भरला असेल आणि समाजकल्याण विभागाकडून त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती येणार असल्याची खात्री महाविद्यालयाला झाली तर अशा विद्यार्थ्यांना दाखले वितरीत करण्यात येतील. कोणाचे शैक्षणिक नुकसान होईल, असे नाही. तरी सर्वांनी सहकार्य करावे.

- कृष्णाजी गायकवाड, प्राचार्य महाविद्यालय, दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com