<p><strong>नाशिक | प्रतिनिधी </strong></p><p>नाशिकची होळी रंगपंचमी प्रसिद्ध आहे. येथील रहाडीतील अनोख्या रंगपंचमीची दरवर्षीच आकर्षण असते. मात्र यंदा करोनाच्या संकटामुळे रंगपंचमी, होळीचा सण घरगुती पद्धतीने साजरी करण्यात येत आहेत. यामुळे नाशिककरांसाठी आज दैनिक देशदूतच्या वतीने आज नाशिकमधील प्रसिद्ध कवींच्या कविता याठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अनोख्या उपक्रमात सविता पोतदार, प्रशांत केंदळे, जयश्री वाघ, भरतसिंग पांडे यांनी सहभाग नोंदवला आहे. तर संवाद देशदूतच्या मुख्य उपसंपादक वैशाली सोनार (शहाणे) यांनी साधला आहे. </p>