
पुनदखोरे । वार्ताहर
कळवण शहरात तीन महिन्यांपासून जंतूनाशक फवारणी करण्यात आली नसून कळवण नगरपंचायत प्रशासनाने उपाययोजना राबवावी या मथळ्याखाली ‘देशदूत’मध्ये वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. या वृत्तामुळे कळवण नगरपंचायत प्रशासनाला जाग येऊन शहरातील रामनगर परिसरातून जाणार्या स्मशानभूमी रस्त्यावर जंतुनाशक फवारणीस सुरुवात केली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दुसर्या लाटेत मोठया प्रमाणात करोना रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. आजपावोत तालुक्यात 750 च्या वर रुग्ण अॅक्टीव्ह आहे. तर सुमारे 45 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यांपासुन करोनाच्या दुसर्या लाटेने संपुर्ण देशात हाहाकार माजविला आहे. राज्य शासन करोना विषाणूचा फैलाव होऊ नये, म्हणून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवित आहे.
पंरतू तीन महिन्यांपासून कळवण शहरात नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना राबविली जात नव्हती. त्यामुळे नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आज मात्र दैनिक ‘देशदूत’च्या वृत्तामुळे प्रशासनाला जाग येऊन जंतू नाशक फवारणी करण्यात आली. दरम्यान, मागील आठवड्यात संपुर्ण कळवण शहरात ‘जनता कर्फ्यू ’ पाळण्यात आला होता. त्याचप्रमाणे दि.22 एप्रिलपासुन शासनाच्या नियमाप्रमाणे शहरात सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण दुकाने बंद करण्यात आली असुन कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासन आपली भूमिका मात्र चोख बजावत आहे. कळवण नगरपंचायत प्रशासनाने शहरात विविध उपाययोजना राबवावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.
कळवण नगरपंचायत प्रशासनाना दैनिक देशदूतच्या बातमीमुळे जाग आल्याने स्मशानभुमीकडे जाणार्या रस्त्यावर जंतू नाशक फवारणी केली आहे. इतर प्रभागांमध्ये विविध उपाययोजना राबवावी. बातमीमुळे प्रशासनाला जाग आल्यामुळे दैनिक देशदूतचे आभार मानतो.
सागर जगताप, तालुकाध्यक्ष आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती
कळवण नगरपंचायत प्रशासनाने रामनगर स्मशानभुमीकडे जाणार्या रस्त्यावर जशी जंतूनाशक फवारणी केली. त्याचप्रमाणे शहरातील सर्व 17 प्रभागांमध्ये विविध उपाययोजना राबवण्यात याव्यात.
प्रदीप पगार, तालुकाध्यक्ष छावा क्रांतीवीर सेना