Deshdoot News Impact : ब्लॅकस्पॉट वरील कचरा उचलला

Deshdoot News Impact : ब्लॅकस्पॉट वरील कचरा उचलला

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

प्रभाग 16 (Ward 16 )मधील रामदासस्वामी नगर बसस्थांबा(Ramdas Swami Nagar Bus Stop ), गांधीनगर फुटबॉल मैदानासमोरील पडीक जागेत अनेक महिन्यांपासून कुजलेला कचरा अखेर साफ झाल्याने प्रभागातील नागरिकांनी दै. 'देशदूत'चे आभार मानले.

गेल्या आठवड्यात ‘शून्य कचरा अभियानाचा फज्जा’ या मथळ्याखाली दै.' देशदूत'मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. छायाचित्रासह आलेल्या यावृत्ताची गंभीर दखल घेऊन महापालिका अंतर्गत आरोग्य, स्वच्छता विभाग व त्यातील कर्मचार्‍यांनी रामदासस्वामी नगर येथील बसस्थंबा मागील नाल्यातील प्लास्टिक पिशव्यांचा खच, केरकचरा, उघड्यावरील शिळे उष्टे अन्न उचलले.

जनता विद्यालय, गांधीनगर फुटबॉल मैदानासमोर साचलेले ढिगारे, कचर्‍याची विल्हेवाट लावली. योग्य वेळी आणि योग्य रीतीने कचर्‍याची विल्हेवाट लावली जात नसल्याने कचरा कुजून दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या असंख्य तक्रारी होत्या. डास, माशा, चिलटे यांचा प्रादुर्भाव होऊन साथ आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला होता. महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू असल्याने तक्रार करण्याची सोय राहिलेली नाही. माजी नगरसेवकांनी गांभीर्य दाखवले नाही. नागरिकांच्या आरोग्य संबंधी तक्रारी, प्रश्नांना अग्रक्रम देऊन देशदूतमध्ये याबाबत छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. प्रशासकीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात येऊन दोन दिवसांपुर्वी ब्लॅकस्पॉट वरील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. दुर्गंधी जाऊन रस्ता साफ दिसल्याने दै. देशदूतचे येथील नागरिकांनी मनोमन आभार मानले.

शासन, प्रशासन व इतर न्यायिक संस्थेकडून पायाभूत सुविधांची गळचेपी, चालढकल केली जाते, त्यावेळेस लोकशाहीचा चौथा स्तंभ नागरिकांसाठी धावून येतो. याची प्रचिती पुन्हा आज प्रभाग 16 मधील नागरिकांना आली. कचर्‍यासंबंधीचे सविस्तर वृत्त दै. देशदूतमध्ये प्रसिद्ध झाले आणि यंत्रणेची कुंभकर्णी झोप उडाली. यापुढे उघड्यावर कचरा टाकणार्‍या नागरिकांना तातडीने दंड करून त्यांची नावे ठळक अक्षरात रस्त्याच्या मधोमध लावण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com