'देशदूत' वृत्ताची दखल : पिंपळगाव खांब येथील लसीकरण सुरळीत

'देशदूत' वृत्ताची दखल : पिंपळगाव खांब येथील लसीकरण सुरळीत

नवीन नाशिक । वार्ताहर

पिंपळगाव खांब येथील लसीकरण केंद्रावर राजकीय गोंधळाबाबत दै. देशदूतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन अखेर लसीकरण सुरळीत सुरू झाल्याची माहिती केंद्रप्रमुख सुनीता सोनवणे यांनी दिली आहे.

पिंपळगाव खांब येथील लसीकरण केंद्रावर होणारा राजकीय हस्तक्षेप, स्थानिक व बाहेरील नागरिकांमध्ये असलेले वादविवाद विकोपाला जात होते. सदरचे केंद्र पाथर्डी परिसरासाठी असूनही त्या ठिकाणी वृद्ध, अपंग, ज्येष्ठ नागरिकांना लसीपासून रिकाम्या हाताने परतावे लागत होते. त्यामुळे वाढत चाललेला राजकीय हस्तक्षेप न करण्याची विनंती लसीकरण धारकांनी देशदूतच्या माध्यमातून केली होती. या वृत्ताची दखल घेत लसीकरण सुरळीत सुरू झाले आहे.

दुसर्‍या लसीकरण केंद्राची मागणी

पाथर्डी परिसर मोठा असल्याने येथील लोकसंख्या लक्षात घेता येणार्‍या काही दिवसात या ठिकाणची लसीकरण लवकर पूर्ण होणार नाही. तसेच जाण्यायेण्याच्या दृष्टिकोनातून परिसरात आणखी दुसरे लसीकरण केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता असल्याची जाणीव माजी नगरसेवक संजय नवले, राम बडगुजर, गिरीश जोशी, गणेश ठाकूर, प्रदीप खताळे यांनी महापौरांना करून दिली होती. विशेष म्हणजे आर के लॉन्स या ठिकाणीच नवले यांनी जागा व कर्मचारी उपलब्ध करून देण्याचेही महापौरांना सांगितले होते. दुसरे केंद्र होण्यासाठी नगरसेवक भगवान दोंदे हेही प्रयत्नशील आहेत दुसरे केंद्र झाल्यास परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com