
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
येथील रस्ते गॅस पाईपलाईनसाठी ( Gas Pipeline work) खोदण्यात आले होते. मात्र, रस्ते दुरुस्त न केल्यामुळे या खड्ड्यांमध्ये धोंगडेनगरमधील ज्येष्ठ नागरिक आणि धोंगडे नगर मित्र मंडळाने वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध केला होता. याबाबतचे वृत्त दै. देशदूतमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याची दखल ( Deshdoot News Impact ) घेत प्रशासनाने रस्ते दुरुस्तीला सुरूवात केली आहे.
धोंगडे नगर मंडळाचे अतुल धोंगडे, अतुल उपाध्ये, बाळासाहेब धोंगडे, उषा डहाके, मुक्ताबाई धोंगडे, भगवंत रामणानी, गीता सिंग, कुसूम गायधनी, सवित चव्हाण, प्रशांत भालेराव, नयन धोंगडे, अतुल चव्हाण, शिवा धोंगडे, उदय जोशी, मयुरेश भालेराव, गौरव हांडोरे, यश हारदे, सचिन कुलथे, स्वप्निल कराड आदींनी आंदोलन केले होते.
दत्तमंदिर रोड, आनंद नगर, धोंगडे नगर, मोटवाणी रोड, आर्टिलरी सेंटर रोड आदी भागात रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे या खड्ड्यात पाणी साचून अपघात होत आहेत. महापालिका आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही खड्डे बुजविले जात नव्हते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात झाडे लावण्याचे आंदोलन ज्येष्ठांनी केले. त्याला यश आल्याचे अतुल धोंगडे यांनी सांगितले.