देशदूत वृत्ताची दखल : महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी होणार उपाययोजना

रस्ता सुरक्षा महामार्ग अधिकाऱ्यांची पाहणी
देशदूत वृत्ताची दखल :  महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी होणार उपाययोजना

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे Belgaon Kurhe

गेल्या पंधरा दिवसांपासून महामार्ग क्रमांक ३ वर विल्होळी ते घोटी दरम्यान अपघातांचे ( Accidents Between Vilholi to Ghoti ) प्रमाण प्रचंड वाढले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा अशा आशयाची बातमी 21 मे रोजी दैनिक 'देशदूत' मध्ये प्रसिद्ध झाली होती. तिची दखल राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडून (National Highways Authority) घेण्यात आल्याने नागरिकांनी दैनिक 'देशदूत'चे आभार मानले. .

या महामार्गवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी या मागणीचे निवेदन रस्ते सुरक्षा कृती समिती मुख्य निमंत्रक संदीप भाई पागेरे,अध्यक्ष डॉ. रुपेश हरिशचंद्र नाठे, कार्यकारी अध्यक्ष सिमा दिवटे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी यांना दिले होते. त्याची व बातमीची दखल घेऊन महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणीकेली. अपघाती झोन असलेल्या लेकबिल फाट्यावर लवकरच लोखंडी पुलाची निर्मिती (iron bridges)होणार असल्याने अपघात टळणार आहेत.

महामार्गवर प्रत्येक फाट्याच्या आधी वाहनांची गती कमी करण्या साठी आधुनिक प्रकारचे गतीरोधक बसवण्यात येणार असून यामुळे वाहनांची 30 पर्यंत गती असणार आहे. याबरोबरच प्रत्येक ठिकाणी दिशा दर्शक फलक बसवण्यात येणार आहेत. महामार्गवर प्रत्येक ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे पथदीप देखील बसवण्यात येणार आहेत. महामार्ग प्रशासनाने एक राखीव रुग्नवाहीका द्यावी अशी मागणीही यावेळेस करण्यात आली. यावेळी सर्व पुलांची पाहनी करण्यात आली. पावसळ्याच्या अनुषणगाने सर्व उपाय योजना ८ दिवसात पुर्ण होइल असा शब्द महामार्ग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला .२ जुन पासुन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

या पुढे सर्व महामार्गाच्या कामांवर रस्ता सुरक्षा कृती समीती लक्ष ठेवनार असल्याचे कृती समितीचे तथा हिंदवी स्वराज्य ग्रुप संस्थापक अध्यक्ष डॉ. रुपेश नाठे यांनी सांगितले. यावेळी मुख्य निमंत्रक संदीप भाई पागेरे, अध्यक्ष डॉ. रुपेश हरिशचंद्र नाठे , कार्यकारी अध्यक्ष सिमा दिवटे , गोकुळ धोंगडे , आत्माराम मते , संजय कश्यप , ऋशीकेश मुधळे , अजय कश्यप , संतोश आहेर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com