Deshdoot News Impact : हिरकणी कक्षाचे कुलूप उघडले

Deshdoot News Impact : हिरकणी कक्षाचे कुलूप उघडले

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

महिलांसाठी येथील नवीन बसस्थानकात Malegaon ST Stand उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष Hirkani Room कुलूप बंद Locked असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत होती. हिरकणी कक्षाची निर्मिती महिलांच्या सुविधेसाठी की असुविधेसाठी याकडे दै.‘देशदूत’ने वृत्त प्रसिध्द करताच हिरकणी कक्षाचे कुलूप प्रशासनातर्फे उघडण्यात आले आहे Hirkani room unlocked .

येथील नवीन बसस्थानकावर राज्य परिवहन महामंडळातर्फे लहान बाळांना दूध पाजणार्‍या महिलांची गैरसोय दूर होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानकात स्वतंत्र हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. या कक्षात गादी, पलंगासह पंखा देखील लावण्यात आला होता. त्यामुळे स्थानकातील ओट्यावर बसून बाळांना दूध पाजणार्‍या महिलां प्रवाशांसाठी हा हिरकणी कक्ष मोठा आधार ठरून गैरसोय दूर करणारा ठरला होता. त्यामुळे या उपक्रमाचे महिला प्रवाशांतर्फे स्वागत देखील करण्यात आले होते.

मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या हिरकणी कक्षास कुलूप लावण्यात आले असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत होती. बसस्थानकातील दुरवस्थेसंदर्भात दै.‘देशदूत’ने प्रकाशझोत टाकला होता. कुलूप बंद असलेल्या हिरकणी कक्षामुळे होत असलेल्या गैरसोयीबद्दल महिला प्रवाशांची व्यथा देखील मांडण्यात आली होती.

हे विशेष वृत्त दै.‘देशदूत’मध्ये झळकताच त्याची दखल घेत आगार प्रशासनातर्फे तातडीने हिरकणी कक्षाचे कुलूप काढण्यात आले. त्यामुळे बाळास दूध पाजण्यासाठी पुन्हा सुरक्षित जागा व सुविधा उपलब्ध झाल्याने महिला प्रवाशांतर्फे समाधान व्यक्त केले गेले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com