
देवळाली कॅम्प। प्रतिनिधी Deolali Camp
येथील हौसनरोडवरील कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या पडीत जागेवर पडलेला मलबा कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने त्वरित उचलावा, अशी मागणी रिपाइं (आ.)गट रिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आला होता.
या ढिगार्यामुळे वाहन पार्किंगला अडथळा निर्माण होत असल्याबाबत काही दिवसांपूर्वी दै.‘देशदूत’ वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. अखेर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दखल घेत काल (दि. 19) मलब्याचे ढिगारे उचलण्यास सुरुवात केली.
आता पार्किंगसाठी मोठी जागा मोकळी होईल, याबाबत रिक्षा युनियन अध्यक्ष अनिल खडताळे, संजय मोरे, राजू आवारे, सोनू साठे, संतोष डाके आदींनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे आभार व्यक्त केले.