दै.'देशदूत' वृत्ताची दखल : चेंबर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

दै.'देशदूत' वृत्ताची दखल : चेंबर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

नवीन नाशिक । प्रतिनिधी

उंटवाडीतील तिडकेनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, कालिकानगर, जगतापनगर येथे काही भागात नुकतेच डांबरीकरण झाले. त्यानंतर आणि पूर्वीही पावसाळी आणि भुयारी गटारींचे चेंबर रस्त्याखाली दबले होते. ते दुरूस्त करावे, याबाबत दै. देशदूतमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

तसेच सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, बाबासाहेब गायकवाड, शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड यांच्यासह रहिवाशांनीही मागणी केली होती. त्यानंतर महापालिका अधिकार्‍यांनी दबलेल्या चेंबरची संयुक्त पाहणी केली.

आठ दिवसांनंतर गुरूवारी (दि. 27) चेंबर दुरुस्तीच्या कामाला तिडकेनगरच्या अनमोल व्हॅलीमागील मधुरा पार्क येथून सुरुवात झाली. याबाबत शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, श्रीकांत नाईक, दिगंबर खरे, संदीप महाजन आदींसह रहिवाशांनी समाधान व्यक्त करून देशदूतचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com