सहकार्‍यांनी दिलेल्या आत्मविश्वासाने जबाबदारी पेलली

सहकार्‍यांनी दिलेल्या आत्मविश्वासाने जबाबदारी पेलली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

काळानुसार अनेक व्यवसायात बदल घडत गेले. व्यवसायांची कार्य पद्धत working method of businesses बदलली . हे सगळ होत असताना बहुतेक उद्योगव्यवसाय पुरुष केंद्री अशाच मार्गाने पुढे वाटचाल करताना दिसून येतात. या अशा पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत पेट्रोलपंपसारख्या धावपळ, वर्दळीच्या व्यवसायात अचानक वडील, भाऊ यांच्या जाण्याने ओढवलेल्या दुःखद प्रसंगातून खंबीर नेतृत्व म्हणून पुढे येत, पेट्रोलपंपच्या व्यवसायात जबाबदारीने उभ्या राहिलेल्या प्रीतू जैन Preetu Jain यांंच्याशी देशदूत नवदुर्गामध्ये Deshdoot - Navdurga देशदूतच्या कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांनींं गप्पा मारल्या.

महिला असून एका पेट्रोल पंपच्या मालकचालक ही सुरुवात कशी झाली यावर बोलताना जैन म्हणाल्या की, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले शंभर टक्के योगदान देताना आपण पाहतो. परंतू समाजात काही अशा चालीरिती आहे ज्यामुळे आजही महिला त्यांच्या पूर्ण क्षमतेने सहभाग घेऊ शकत नाही. अशाच समाजाच्या पगड्यामुळे घरचा पंप असतानाही कधी पंपावर न गेल्यामुळे जेव्हा वडील आणि भाऊ यांच्या अचानक जाण्याने ती जबाबदारी माझ्यावर आली.

त्यावेळी काय आणि कसं करणार याबद्दल कुठलीच माहिती नव्हती.त्यावेळी फक्त आत्मविश्वास होता, जो तिथे काम करत असलेल्या सहकार्‍यांनी दिला.

आपल्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना पुढे त्या म्हणाल्या,कामं करताना कधीही कुठले कामं अर्धवट सोडून न देण्याचा वडिलांचा सल्ला, त्यांनी कोणताही फरक न करता केलेले पालन पोषण, यातूनच येणार्‍या प्रत्येक परिस्थितीत लढायची ताकद मिळाली.मी हे करु शकते आणि मला हे केलेच पाहिजे हा विश्वास निर्माण झाला.कारण इतरांना माझ्या कामावर,कर्तृत्वावर भरवसा आहे तर मला स्वतःलाही तो असलाच पाहिजे. या सगळ्या वैचारिक प्रोत्साहनामुळे आजवरच्या अनेक चांगल्या वाईट अनुभवातून पुढे जाणे शक्य झाले.

त्या पुढे असेही म्हणाल्या की काम करतं असताना अनेक आव्हाने होती. त्यासाठी कामाचे स्वरुप समजून घेण्यापासून सुरुवात केली. ग्राहक, कर्मचार्‍यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वेळप्रसंगी लोकांसोबत उभे राहून काम केले. त्यामुळे त्यांना समजून घेणे सहज शक्य झालें.हा व्यवसाय संवेदनशील असल्यामुळे नेहमी सर्तक राहावे लागते. परंतू हळूहळू सवयीने अनेक गोष्टींची उकल होत गेली.

शेवटी बोलताना त्यांनी आपल्या हक्कांसाठी लढायला शिका, त्यात महिला असाल तर ती कोणतेही काम करूच शकते हे लक्षात घेतले पाहिजे.मात्र हे सगळें शक्य होण्यासाठी प्रत्येक पुरुषाकडून प्रोत्साहन मिळाले तर येणार्‍या काळात अनेक महिला पुरुषप्रधान व्यवसायात अग्रेसर असतील.

स्वतःला देवीचे ममत्व हे रूप अधिक भावते. कारण समाजात अधिक कटुता आहे. त्यात पेट्रोलपंपसारख्या ज्वलंनशील व्यवसायात जितके खंबीरपणे संकटांना सामोरे जाण्याची तयारी लागते, त्याचवेळी प्रेमाने, आदराने संवाद सुध्दा साधावा लागतो हे त्यांनी आवर्जून सांगितले.

Related Stories

No stories found.