Video : देशदूत नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पोला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी| Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या 'देशदूत' आयोजित तसेच दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (Deepak Builders) प्रायोजित 'नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२३'  प्रदर्शनाचा (exhibition) शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला...

यावेळी पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नाशिकरोड देवळाली (Deolali) व्यापारी बँक अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, संचालक मनोहर कोरडे व माजी नगरसेवक दिनकर आढाव यांच्या हस्ते प्रॉपर्टी एक्स्पोचे (Property Expo) उदघाटन करण्यात आले. तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी 'देशदूत'चे मार्केटिंग महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. रविवार (दि.२९) पर्यंत तीन दिवसांत प्रदर्शनाचे आयोजन नाशिकरोड, जेलरोड येथील मनपा आरक्षित नियोजित नाट्यगृह जागेच्या मोकळ्या भूखंडावर करण्यात आले आहे. दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांना येथे खुला प्रवेश आहे. घर असो वा दुकान सर्व गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनात नाशिक (Nashik) शहरातील त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे २४ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम (Construction) व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या 'देशदूत' परिवाराचे कौतुक केले. प्रदर्शनाचे प्रायोजकत्व नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी स्वीकारले आहे. तीन दिवसात दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान ४ विजेत्यास सोनी गिफ्ट्स तर्फे रोज आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. सोनी गिफ्ट प्रा. ली. हे गिफ्ट पार्टनर तर, स्पायडर मीडिया हाऊस हे प्रदर्शनाचे इव्हेंट पार्टनर आहेत.

गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दै. देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग अधिकारी आनंद कदम,भगवंत जाधव, समीर पाराशरे, रितेश जाधव, विशाल जमधडे यांनी परिश्रम घेतले. तर अमोल घावरे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com