
नाशिक | प्रतिनिधी Nashik
दैनिक ’देशदूत’ आयोजित आणि आयव्होक ऑप्टिकल अॅन्ड व्हिजन केअर प्रायोजित ‘जीवन संजीवन पुरस्कार’ सोहळ्याअंतर्गत 5 विविध तज्ज्ञ डॉक्टरांना ’जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल डॉ. विजय काकतकर यांच्या विषयी दोन शब्द....
किफातशीर दरात विश्वासार्ह खात्रीशीर उपचाराची हमी यामुळेच नाशिकचे डॉ. विजय काकतकर गेले 46 वर्ष अस्थीरोग तज्ज्ञ म्हणून लौकीक टिकवून आहेत. 50 वर्षांपूर्वी शहरात अवघे चार अस्थीरोग तज्ञ होते. तेव्हापासून सुरु झालेला डॉ.काकतकर यांचा प्रवास आज शहरातील दोनशे अस्थीरोग तज्ज्ञांपर्यंत जाऊन पोहचला असला तरी नाशिकच्या दोनशे किलोमीटर परिघात आजही कोणाचे हाड मोडले तर सर्व प्रथम ओठावर डॉ. काकतकर हेच नाव येते. डॉ. विजय काकतकर यांंनी 1973 मध्ये पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
1976 मध्ये द कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन मुंबई येथे ऑर्थोपेडिक्समध्ये डिप्लोमा केला. 1977 मध्ये पुणे विद्यापीठातून शस्त्रक्रिया पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. ते नाशिकच्या पहिल्या चार पात्र ऑर्थोपेडिक सर्जनांपैकी एक. त्यांनी टोटल रिप्लेसमेंट सर्जरी, अपघात आणि स्पोर्ट्स इजा उपचारांमध्ये रस घेतला. त्यांंच्या उपचारांने समाधानी झालेले अनेक रुग्णच नंतर त्यांंची माऊथ पब्लिसिटी करु लागलेे. संधिवात, हाडे आणि अपघाती फ्रॅक्चर, प्राथमिक आणि पुनरावृत्ती/एकूण गुडघा आणि हिप रिप्लेसमेंट यात त्यांचा हात कोणी धरु शकत नाही.
डॉ. काकतकर यांनी हॉस्पिटलची स्थापना 1983 मध्ये केली. सुरुवातीला, हा एक छोटासा सेटअप होता, नंतर हळूहळू विस्तारित झाला आणि आता अनेक इनहाउस सुविधांसह 60 बेडच्या सेटअप सज्ज आहे. पाय, हिप आणि गुडघा बदलणे, तुटलेले हात, खांंदा आणि हाताची शस्त्रक्रिया, ट्रिगर फिंगर, ऑर्थ्रोस्कोपी, फ्रॅक्चर उपचार आणि ऑर्थ्रोप्लास्टीसाठी काकतकर, त्यांचे पुत्र, कन्या व सहकारी 24 तास सज्ज असतात. गेले 45 वर्ष नावलौकीक टिकण्या मागील रहस्य सांंगताना डॉ. काकतकर म्हणाले की, वैद्यकीय व्यवसायात विश्वासार्हता व खात्रीशीर उपचाराला अतिशय महत्व असते.
40 वर्ष त्याच पध्दतीने काम केले. त्याचे हे फळ आहे. मात्र रोज रात्री साडेबारा पर्यंत काम करतांना कुटुंंबाकडे कायम दुर्लक्ष झाले. मात्र कुटुंंबीयांनी त्यांना समजून घेतले. त्यांच्या सहकार्यामुळेच एवढे काम करु शकलो असे ते सांगतात. गेल्या चाळीस वर्षात अनेकांवर उपचार केले. मात्र सन 2004 मधील अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांच्या अपघातानंतर त्यांंच्यावर केलेल्या उपचाराने खूपच प्रसिध्दी मिळाली. येथील उपचारानंतर ऐश्वर्या रॉय हिंंदुजा रुग्णालयात गेल्या नंंतर तेथील तज्ञांनीसुध्दा काकतकर यांचे उपचार सर्वोत्कृष्ट झाल्याचे सांंंगितल्या नंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुध्दा काकतकर यांच्याशी संवाद साधून आभार मानले. तो क्षण अविस्मरणीय असल्याचे ते सांगतात.
येत्या चार वर्षानी काकतकर हॉस्पिटल सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. तत्पूर्वी उत्तर महाराष्ट्रात सर्व सुविधांनी सुसज्ज असे काकतकर हॉस्पिटल नाशिककरांच्या सेवेत तीन चार महिन्यात दाखल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. जर्मन कंपनीचे तंत्रज्ञान वापरुन केलेले येथील ऑपरेशन थिएटर हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ऑपरेशन थिएटर असणार आहे. येथे दाखल झालेल्या रुग्णाला इतरत्र कोणत्याही कारणासाठी जाण्याची गरज भासणार नाही. जनकल्याण रक्तपेढीच्या सैाजन्याने रक्तसाठाही येथे कायम उपलब्ध राहणार आहे.एकाच छताखाली सर्व सुविधा असतील. या हॉस्पिटलने समाजातील दायीत्व म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट टिचींग सुरु ठेवले आहे. आतापर्यंंत 85 ऑथोपेडीक सर्जन येथून तज्ज्ञ होऊन देशभर सेवा करत आहे. ते शिक्षण या पुढेेही सुरु राहणार आहे.
गैरसमज नसावा
डॉ.काकतकर यांच्याकडूनच उपचार हवे असे आजही प्रत्येकाला वाटते. त्यामुळे रोज पाच पन्नास रुग्णांंना ते तपासताही. मात्र ऐनवेळी किरकोळ दुखणे दाखविण्यासाठी येणार्यांना त्यांंची वेळ घ्यावी लागते. ठऱलेल्या वेळी यावे लागते. त्यामुळे डॉक्टर लवकर भेटत नाही हो ! असे सर्रास म्हटले जाते. त्याबाबत काकतकर म्हणाले की, तो गैरसमज आहे. तातडीच्या इमर्जन्सी रुग्णांला आमचे दरवाजे 24 तास खुले आहे. मात्र ओपीडीसाठी थोडा वेळ लागतो. मी भेटत नाही. यात अजिबात तथ्य नाही. तो विनाकारण झालेला गैरसमज आहे.