Deshdoot News Impact : रस्ते दुरुस्तीस प्रारंभ

Deshdoot News Impact : रस्ते  दुरुस्तीस प्रारंभ

निफाड । प्रतिनिधी Nip[had

राज्य क्रं.23 वरील नांदूरमध्यमेश्वर Nandurmadhyameshwar जवळ बंद पडलेल्या रस्ता कामाबाबत Road Works दै. देशदूतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन यंत्रणा खडबडून जागी होत अखेर काल गुरुवार दि.30 पासून संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीस प्रारंभ केला असून प्रवाशी व ग्रामस्थांनी दै. देशदूतचे आभार मानले आहे.

सुरत, वघई, वणी, निफाड, नांदूरमध्यमेश्वर, सिन्नर, घोटी या राज्य क्रं. 23 चे नूतनीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेवून ते सुरू केले होते. अद्यापही या कामात अनेक त्रुटी आहेत. दिंडोरी जवळचे कालव्यावरील वळण रस्ता हा धोकादायक ठरत आहे. रस्त्याची अनेक ठिकाणी रूंदी कमी असून अनेक ठिकाणी साईडपट्टया नाहीत. नको तेथे गतिरोधक टाकल्याने त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यातच नांदूरमध्यमेश्वर गावाजवळ गेल्या चार महिन्यापासून हे काम बंद पडले होते. तर अन्य एका ठिकाणी रस्ता वाद असल्याने तेथेही काम बंद आहे. त्यामुळे हा वाद मिळून तेथेही काम सुरू करणे गरजेचे आहे.

साहजिकच या बंद पडलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरु व्हावे यासाठी दै. देशदूतने मंगळवार दि.21 सप्टेंबर रोजी ‘रस्ता काम रखडल्याने वाहन चालक बेजार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. साहजिकच सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तत्काळ दखल घेत संबंधित ठेकेदारास काम सुरू करण्याच्या सूचना केल्या.

परिणामी काल गुरुवारी संबंधित ठेकेदाराची मशिनरी रस्ता कामासाठी हजर झाल्यानंतर खडी टाकण्याबरोबरच ती पसरवून दाबण्याचे काम देखील सुरू करण्यात आले. मात्र आता बंद पडलेले काम सुरू झाल्याने ते दर्जेदार व्हावे याकडे ग्रामस्थ, संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी लक्ष देवून या रस्त्याला साईडपट्टया व नाल्याची निर्मिती करावी अशी मागणी होत आहे. बंद पडलेले काम सुरू झाल्याने प्रवाशी व नागरिकांनी देशदूतचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.