देशदूत इम्पॅक्ट: रस्ते दुरूस्ती कामाला अखेर मुहूर्त

टाकळी रोडवर खड्डे बुजवण्यास सुरूवात
देशदूत इम्पॅक्ट: रस्ते दुरूस्ती कामाला अखेर मुहूर्त

नाशिक रोड । प्रतिनिधी | Nashik Road

मोठी दुरवस्था झालेल्या जेलरोड-टाकळी रोडची अखेर महापालिकेच्या आयुक्तांनी दखल घेतल्याने खड्डे (potholes) बुजविण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत दै. देशदूतमध्ये (deshdoot) वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते.

तसेच भाजपचे (bjp) महानगर राजेश आढाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या प्रश्नी आयुक्तांची भेट घेऊन रस्ता डांबरीकरणाची (Road asphalting) मागणी केली होती. त्यानंतर आयुक्तांनी अधिकार्‍यांना पाठवून रस्त्याची पाहणी केली आणि त्वरित कामाला सुरुवात केली. सततच्या पावसाने (rain) गेल्या काही महिन्यांपासून हा महत्वाचा रस्ता खराब झाला होता. ठिकठिकाणी खड्डे (potholes) पडले होते.

दुचाकी, चारचाकी चालकांना समस्यांला तोंड द्यावे लागत त्यांना मणके, पाठीचे त्रास सुरु झाले होते. गाडीचे नुकसान होत होते. नाशिकहून (nashik) जेलरोडला पोहचण्यासाठी उपनगर आणि नांदुरनाका हे दोन पर्यायी मार्ग आहेत. मात्र, त्या मार्गाने जादा वेळ, पैसा खर्ची पडत असल्याने नागरीक जेलरोड-टाकळी रोडचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

विद्यार्थी, नागरिक, शासकीय व खासगी कर्मचारी या रस्त्याचा वापर जास्त हा रस्ता अरुंद (narrow road) आहे. त्यातच पावसामुळे (rain) ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चारचाकी तर सोडाच परंतु, दुचाकी चालवणेही अवघड झाले होते. लोकप्रतिनिधींनी या महत्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. आता रस्ता काम (raod work) सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लॅमरोडची डागडूजी; नागरिकांत समाधान

देवळाली कॅम्प | लॅमरोड (lam raod) हा महत्त्वाचा रस्ता खराब झाल्याने जनतेचा सार्वजनिक बांधकाम खात्यावर (Department of Public Works) प्रचंड रोष होता. या प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते पवन आडके यांनी दै. देशदूतच्या माध्यमातून उपोषणाचा इशारा देताच आ. सरोज अहिरे यांच्या माध्यमातून सदर रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ झाल्याने जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

लॅमरोडच्या दुरूस्ती कामाला सहा महिन्यापूर्वी सुरुवात झाली मात्र ठेकेदाराच्या कासव गतीने सुरू असलेल्या कामामुळे ऐन पावसाळ्यात रोडची दयनीय अवस्था होऊन वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पवन आडके यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम (road repair) आठ दिवसात सुरू न झाल्यास आ.अहिरे यांच्या कार्यालयासमोर जनतेसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.

त्याची दखल घेत आ. अहिरे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत जाब विचारत कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसात या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काल नागझिरा नाल्यापासून सहा नंबर नाक्याकडे जाणार्‍या मार्गावर काम सुरू करण्यात आले. नागझिरा नाला ते रवी सोसायटी या दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यात येऊन त्याला डांबरीकरणाचे पॅच देण्यात आले. येत्या दिवसात हा संपूर्ण रस्ता डागडुजीने पूर्ण होणार असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. सदर रस्ताकाम सुरू झाल्याने वाहनधारकांचा त्रास कमी होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com