
पालखेड बंधारा । वार्ताहर
दिंडोरी (dindori) - कोराटे या रस्त्याचे काम (road work) अतिशय निकृष्ट होत असल्याने दैनिक देशदूतने (deshdoot) याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते व कोराटे येथील नागरिकांनी आंदोलनाचा (agitation) इशारा दिला होता.
त्याची संबंधित विभागाने तत्काळ दखल घेवून चांगल्या दर्जाचे काम सुरुवात केल्याने नागरिकांनी दैनिक देशदूत व संबंधित विभागाचे आभार मानले आहे. तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा रस्ता असून या रस्त्याने सह्याद्री (Sahyadri), दिंडोरी (Dindori), ओझर (ozar), पिंपळगाव बसवंत (pimpalgaon baswant), मोहाडी (mohadi), नाशिक (nashik), येथील नागरिकांची सतत ये-जा असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते.
याशिवाय औद्योगिक वसाहत (Industrial estate) याशिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या (students) बसेस याच रस्त्यावरून धावत असतात. त्यामुळे होत असलेले काम व या कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने ना लेवल, ना पाणी, ना डांबर,याशिवाय पुढे काम मागे खड्डे अशी अवस्था या रस्त्याची झाली होती. येथील नागरिकांनी हे काम बंद करण्याची मागणी करून आंदोलन (agitation) करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर हे काम नागरिकांकडून बंद पाडण्यात आले होते. याची संबंधित खात्याने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर चांगल्या दर्जाचे डांबर, खडी,टाकून हे काम पुन्हा सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त करून आले आहे. परिसरातील नागरिकांनी व शेतकर्यांनी दैनिक देशदूतचे आभार मानले आहे.